Bride Haldi Viral Dance Video : हळद असो, लग्न असो किंवा वरात किंवा आणखीन इतर कोणतं फॅमिली फंक्शन त्या कार्यक्रमात डीजे तडका लागल्यावर वातावरण एकदम दुप्पट उत्साही होऊन जाते. विशेषत: जेव्हा बॉलीवूड गाण्यांचे देसी बीट्स वाजवले जातात, तेव्हा केवळ पाहुणे मंडळी, कुटुंबातील सदस्य नाही तर अगदी नवरा-नवरीही नाचायला लागतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडीओमध्ये नवरी स्वतःच्या हळदीत नाचताना दिसते आहे.

नवरी मुलगी सुप्रियाची हळद सुरु असते. १९८३ मध्ये प्रदर्शित झालेल्या हिम्मतवाला या चित्रपटातील “नैनों में सपना” हे गाणं बॅकग्राऊंडमध्ये लागते आणि सगळे जण नाचायला लागतात. पण, नवरी मुलगी ज्याप्रकारे या गाण्यावर डान्स करते पाहून तुम्ही थक्क होऊन जाल. कारण – गाण्याच्या प्रत्येक ओळीवर तिचे हावभाव, तिच्या स्टेप्स अगदी लक्षवेधी ठरत आहेत, जे पाहून जमलेल्या तिच्या मैत्रिणीही तिच्या डान्स स्टेप्स कॉपी करताना तर काही तिला प्रोत्साहन देताना दिसून आले आहेत.

“आनंदी नवरी” (Viral Video )

नाचणं ही एक कला आहे. पण नाचणं आनंदी होण्याचं आणि स्ट्रेस दूर करण्याचं एक खास तंत्रही आहे. आपण आनंदी असलो की, आपला चेहरा खुलतो, आपण करत असलेल्या प्रत्येक कृतीमधून तो आनंद अगदी प्रकर्षाने जाणवतो. नवरी मुलगी सुप्रियाच्या चेहऱ्यावरही तीच लग्न होणार याचा आनंद, तिच्या डान्स आणि चेहऱ्यावरील हावभावावरून अगदी स्पष्ट दिसून येत होता. आनंदी डान्स हळदीत नवरी मुलीने केलेला डान्स व्हिडीओ व्हायरल व्हिडीओतून एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…

व्हिडीओ नक्की बघा…

सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा व्हिडीओ @ashvii_makeover0325 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. “आनंदी नवरी” ; अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ पाहून नवरी मुलीचे नातेवाईक, मित्र-मंडळी तिच्या कुटुंबातील सदस्य “अप्रतिम ताई” , “सुप्रिया मस्त”, “देवाचे सदैव तुमच्यावर आशीर्वाद असूदेत” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी व्हिडीओखाली केलेल्या दिसून आल्या आहेत आणि हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात नेटकाऱ्यांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे.