आपल्याबरोबर कधी काय होईल हे सांगता येणं अवघड आहे. याचाच अनुभव चेन्नईतील एका व्यक्तीला आला आहे. रविवारी चेन्नई विमानतळावर एका वृद्ध व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा झटका आला. मात्र सुदैवाने, तेथे उपस्थित असलेल्या एका सीआयएसएफ जवानाने प्रसंगावधान दाखवत या व्यक्तीचे प्राण वाचवले. यावेळी जवानाने या व्यक्तीला सीपीआर दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय व्यक्ती चेन्नई विमानतळावर पोहोचल्यानंतर हृदयविकाराचा झटका येऊन बेशुद्ध झाली. मात्र विमानतळावर उपस्थित असलेल्या जवानाने त्वरित हालचाल करत या व्यक्तीला सीपीआर दिला. यामुळे या व्यक्तीच्या नसा कार्यान्वित झाल्या. यानंतर या व्यक्तीला लगेचच रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, सीआयएसएफने सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये घटनेची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत १७ हजारांहूनही अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तसेच, नेटकऱ्यांनी या व्हिडीओवर अनेक प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

१९ वर्षीय कैवल्य वोहरा ठरला भारतातील सर्वात तरुण श्रीमंत! तब्बल १००० कोटींच्या संपत्तीचा आहे मालक

सीपीआर म्हणजे काय?

सीपीआर ही आपत्कालीन परिस्थितीत रुग्णाचा जीव वाचवण्यासाठी केली जाणारी प्राथमिक क्रिया आहे. एखाद्या रुग्णाला जेव्हा हृदयविकाराचा झटका येतो, त्यावेळी त्याचे हृदयाचे ठोके अचानक बंद होतात. अशा परिस्थितीत रुग्णाला सीपीआर दिल्याने रुग्णाचे प्राण वाचण्याची शक्यता असते. वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाला सीपीआर दिल्यास रुग्णाच्या शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रिया थांबत नाही.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video viral cisf jawan gives life to an old man who suffered a heart attack at the airport appreciation poured in on social media pvp
First published on: 29-09-2022 at 15:35 IST