Viral video: सध्या लग्नसराईचा हंगाम सुरू आहे. सोशल मीडियावर लग्नाचे व्हिडिओ आणि फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. लग्नात मुलांची मागणीही खूप वाढली आहे. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये नवरदेव मुलीच्या घरच्यांसमोर हुंड्याची अशी मागणी करतो आणि रागाने मांडवातून निघून जातो. आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. लग्नात हुंडा देणं किंवा घेणं हा एक गुन्हा मानला जातो. मात्र अजूनही काही ठिकाणी हुंडा प्रथा पाहायला मिळते. असाच हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर संताप व्यक्त केला आहे.

या व्हिडिओत आपल्याला शेतातून एक व्यक्ती रागातच जात असल्याचे दिसते. व्यक्तीने डोक्यावर केशरी रंगाचा फेटा घातलेला असतो आणि व्हिडिओतील दाव्यानुसार तो वर असल्याचे सांगण्यात येते. हा वर आपल्याच लग्नातून रागाने पळून गेला होता कारण त्याला हवी असलेली गाडी वधू पक्षाने दिली नाही. खंरतर घडलं असं की, वराने वधू पक्षाकडे स्काॅरपिओ गाडीची मागणी केली होती. लग्नाच्या दिवशी वधूच्या घरचे गाडी देतील अशी वर पक्षाची अपेक्षा होती पण जेव्हा ही अपेक्षा पूर्ण झाली नाही तेव्हा वर भरलग्नातून बाहेर पडला.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, नवरदेव शेतातून जाताना दिसतो तर त्याच्या मागे वऱ्हाडीही त्याचा पाठलाग करताना दिसतात. व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून घटनेत पुढे नक्की काय घडलं आणि ही घटना नक्की कुठली आहे हे मात्र स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ @1no_aalsi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं म्हंटलंय, “जाऊदेत त्याला हुंडा घेणं देणं दोन्ही गुन्हा आहे” आणखी एकानं,  ‘तुम्हाला १५० रुपयेही कोणी देऊ नये.’ दुसर्‍या युजरने लिहिले की, ‘तुला मुलगी दिली आहे, पुरे झाले. अशा अनेक प्रतिक्रिया व्हिडीओवर आल्या आहेत.