scorecardresearch

‘यमराजने भेजा है बचाने के लिए…’ म्हणत एक्सप्रेस वेवर पळवली कार अन् झालं असं काही

video viral : एक्सप्रेसवर 100km वर कार पळवली अन्; पाहा नेमकं काय झालं

road safety india helmet man
हेल्मेट मॅनचा नवा व्हिडीओ समोर (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Helmet man of india भारतात दरवर्षी रस्ते अपघातात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता वाहने चालवण्यात येतात. त्यामुळे रस्ता अपघातांची संख्या जास्त आहे. विशेष म्हणजे अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशात दरवर्षाला सरासरी १ लाख ४७ हजार ९१३ जणांचा मृत्यू होतो. कधी कधी एका छोट्याश्या चुकीमुळे जीव गमवावा लागतो. यामध्ये हेल्मेट न घातल्यामुळे झालेल्या अपघातांचं प्रमाण जास्त आहे. अनेक जण बाईक चालवताना हेल्मेट घालायचे टाळतात. मात्र राघवेंद्र तिवारी नावाचा एक अवलिया असा आहे जो फुकटात हेल्मेट देतो. काही वर्षापूर्वी त्याच्या मित्राचा हेलमेट न घातल्यामुळे रस्ते अपघातात मृत्यू झाला. त्यावेळी अशी वेळ कुणावरच येऊ नये असं त्यानं ठरवलं आणि हेल्मेट वाटपाला सुरुवात केली.

‘यमराज ने भेजा है बचाने के लिए…

राघवेंद्र यांचा नुकताच आलेला व्हिडिओ चर्चेत आहे. त्यात ते हेल्मेट घालून कार चालवताना दिसत आहे. राघवेंद्र यांनीच हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला आहे. या व्हिडीओतील व्यक्ती हेल्मेट न घालता, अतिशय स्पीडनं गाडी चालवत आहे. यावेळी राघवेंद्र यांनांही त्यानं ओव्हरटेक केलं. हेल्मेटन घातल्यामुळे राघवेंद्र यांने एक्स्प्रेस वेवर दुचाकीस्वाराला थांबवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. त्यांनी या व्यक्तीला सांगितले की, ते बऱ्याच वेळापासून त्याचा पाठलाग करत आहेत. यानंतर ते दुचाकीस्वाराला हेल्मेट देतात आणि हे घालूनच गाडी चालवण्यास सांगतात. राघवेंद्र व्हिडीओमध्ये म्हणतात की, ‘माझ्या कारच्या मागे एक मेसेज लिहिलेला आहे. ‘यमराज ने भेजा है बचाने के लिए…ऊपर जगह नहीं है जाने के लिए’ यावेळी राजवेंद्र त्या तरुणाला हेल्मेट भेट म्हणून देतात.

हेही वाचा – ‘यमराजने भेजा है बचाने के लिए…’ म्हणत एक्सप्रेस वेवर पळवली कार अन् झालं असं काही

जुन्या पुस्तकांच्या बदल्यात फ्रि हेल्मेट

बिहारच्या कैमूरमधील बगाढी गावात राहणारे राघवेंद्र तिवारी सर्वांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देत असतात. म्हणूनच लोक त्यांना हेल्मेट मॅन असेही म्हणतात. २००९ साली राघवेंद्र शिक्षणासाठी उत्तरप्रदेशमधील बनारसमध्ये पोहचले. त्यावेळी त्यांचे अनेक मित्र झाले, त्यापैकीच एक मित्र होता कृष्ण, जो आपल्या आई वडिलांचा एकुलता एक मुलगा होता. मात्र एके दिवशी ग्रेटर नोएडा-वेवर हेल्मेटविना त्याचा अपघातात मृत्यू झाला. या घटनेनंतर दुख:तून बाहेर येणं राघवेंद्रला कठीण झालं होतं. तसेत कृष्णाच्या परिवाराला झालेल्या यातना. त्यावेळी त्याचा मित्र आणि परिवारासोबत जे झालं अशी वेळ कुणावरच येऊ नये असं त्यानं ठरवलं आणि हेल्मेट वाटपाला सुरुवात केली. राघवेंद्र तिवारी जुन्या पुस्तकांच्या बदल्यात लोकांना फ्रि हेल्मेट देतो. पहिला लोकांमध्ये जनजागृती करण्याचा त्याचा मानस आहे तर दुसरा जुनी पुस्तक गरिब मुलांना देऊन त्यांच्या आयुष्यात बदल घडवायचा आहे. राघवेंद्र तिवारी यांचा आजवरचा प्रवास खूप संघर्षमय राहिला आहे. आधी नोकरीला रामराम ठोकावा लागला, त्यानंतर हेलमेट खरेदीसाठी पैसे कमी पडत असल्यानं त्यांनी घर आणि पत्नीचे दागिनेही विकले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-03-2023 at 17:29 IST