Shocking video: जगन्नाथ पुरी हे ओडिशा राज्यातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आहे, जेथे भगवान जगन्नाथ यांचे भव्य (विष्णूचा अवतार) मंदिर आहे. हे मंदिर भारतातील चार प्रमुख पवित्र धामपैकी एक आहे. दरवर्षी हजारो भाविक या तीर्थस्थळाला भेट द्यायला जातात. अशात नुकताच सोशल मिडियावर येथे घडून आलेला एक अनोखा आणि दैवी चमत्कार शेअर करण्यात आला आहे. प्राण घ्यायला आलेल्या यमराजाला माणसाने परत पाठवल्याचं तुम्ही बऱ्याच फिल्ममध्ये पाहिलं आहे. असं प्रत्यक्षात शक्य नाही हे आपल्यालाही माहिती आहे, कारण मृत्यू कुणाच्या हातात नाही. पण, तरी फिल्मी लाइफप्रमाणे रिअल लाइफमध्ये असा चमत्कार दिसून आला.

पुरीच्या जगन्नाथ मंदिरात एक भावनिक क्षण घडला जेव्हा एका वडिलांनी आपल्या बेशुद्ध मुलाला मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ नेले आणि कुजबुजत म्हटले, “तू आमची शेवटची आशा आहेस.” आणि पुढे असा चमत्कार झाला ज्यावर कोणाचाच विश्वास बसत नाहीये.

वडील आपल्या मुलाला श्रीमंदिराच्या सिंहद्वारात घेऊन मोठ्याने रडत आणि परमेश्वराकडे आपल्या मुलाला वाचवण्याची याचना करत होते,” असे मंदिराचे सेवक सौम्य रंजन पांडा म्हणाले. व्यक्तीच्या वेदना पाहून सेवकांनी त्याला थेट मंदिराच्या गर्भगृहाजवळ जाण्याचा सल्ला दिला. मूर्तीसमोर दिसताच त्याने आपल्या मुलाला देवचारणी ठेवले आणि जमिनीवर बसून तो मुलाला वाचवण्यासाठी प्रार्थना करताना व्हिडिओत दिसला. मंगला आरतीच्या दरम्यान, मुलगा अचानक थरथर कापला, डोळे उघडले आणि हळूवारपणे “बाबा” अशी हाक मारली. यावेळी “जय जगन्नाथ” च्या जयघोषाने गर्दी उफाळून आली तेव्हा साक्षीदारांना अश्रू अनावर झाले. भाविक याला दैवी हस्तक्षेप म्हणत आहेत, श्रद्धा किती खोलवर पर्वत हलवू शकते याची आठवण करून देणारे. त्या सकाळी उपस्थित असलेल्या अनेकांसाठी, ते केवळ पुनर्प्राप्ती नव्हते; ते पुरीच्या प्रत्येक कोपऱ्यात अजूनही श्रद्धा आहे याचा पुरावा होते.

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ bhaaratinsight नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. नेटकरीही यावर प्रतिक्रिया देत आहेत, एकानं म्हंटलंय नशीब बलवत्तर आणखी एकानं “मृत्यू आला पण देव मदतीला आला धावून” अशी प्रतिक्रिया दिली आहे. एकानं “गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” तर आणखी “जिथे सर्व दरवाजे बंद होतात तिथे आध्यात्म जन्म घेते” अशा वेगवेगळ्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.