Video: जीत का समंदर चुनौतियोंसे भरा है, देशाच्या रक्षणासाठी जवान बर्फाच्या वादळात तैनात

video viral : बर्फाच्या वादळातही जवानानं केलं कर्तव्याचं पालन.

video viral Jawan
बर्फाच्या वादळात जवान तैनात (photo – twitter)

सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात त्यातील काही व्हिडीओमध्ये भारतीय लष्कराचे जवान कठोर परिस्थितीत देशाचे रक्षण करताना आपल्याला दिसतात. लष्करातील जवानांना अनेक कठीण आव्हानांना तोंड द्यावे लागते हे आपणाला माहिती आहे. शिवाय सततच्या तुफान बर्फवृष्टीमुळं जम्मू-काश्मीरमधील बदलत्या हवामानाचा प्रचंड त्रासही त्यांना सहन करावा लागतो. कधी कडक उन्हात तर कधी शरीर गोठवणाऱ्या थंडीत उभं राहून त्यांना आपल्या कर्तव्याचं पालन करावं लागतं. मात्र हा कडाका भारतीय सैन्याला आपल्या कर्तव्यापासून रोखू शकला नाही. सध्या अशाच एका भारतीय जवानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे तो पाहून तुमची छाती अभिमानाने भरुन आल्याशिवाय राहणार नाही.

तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
Skip
तुमची नोंदणीशिवाय वाचनाची मर्यादा संपली आहे.
वाचन सुरू ठेवण्यासाठी कृपया नोंदणी करा अथवा साइन इन करा.
7 व्या लेखांपैकी हा 3 वा लेख आहे ज्यापूर्वी तुम्हाला नोंदणी करावी लागेल
आमच्या विनामूल्य लेखांमध्ये अमर्यादित प्रवेशासाठी, कृपया साइटवर लॉग इन करा
Skip

बर्फाच्या वादळात जवान तैनात –

भारतीय जवान अनेक सुखांचा त्याग करत सीमेवर आपलं कर्तव्य बजावत असतात. या व्हिडीओमध्येही दिसणारा जवान शरीर गोठवणाऱ्या थंडीत बर्फाच्या वादळात संरक्षणासाठी उभा आहे. काश्मीर सीमेवर बर्फाच्छादित परिसरात हा जवान गस्त घालताना दिसत आहे. यावेळी सैनिक आपल्या स्वतःचा तोल सांभाळत असल्याचंही दिसतं आहे. या व्हिडीओतील जवानाने दाखवलेले धाडस आणि त्याचे कष्ट थक्क करणारे आहेत.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – भारतीय रेल्वेला मालामाल करणारी ‘ती’ ठरली पहिली महिला, तिकीट निरीक्षकाचा विक्रम पाहून बसेल धक्का!

सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून लाखे लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तर २ हजारांहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. या व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया आल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-03-2023 at 14:58 IST
Next Story
भारतातील ‘या’ शहरात चक्क ATM मधून पैसे नाहीतर मिळतेय गरमा गरम बिर्याणी, जाणून घ्या अनोख्या मशीनबद्दल
Exit mobile version