scorecardresearch

‘क्या शेर बनेगा रे तू’! भटक्या कुत्र्यांना घाबरून सिंहाने ठोकली धूम, पाहा VIDEO

viral video: सिंह हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो, मात्र चक्क कुत्र्यानं सिंहाला घाबरवलं आहे.

video viral lion
सिंहाने ठोकली धूम (लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

‘अपनी गली में कुत्ता भी शेर होता है’ ही म्हण आपण सर्वांनी ऐकली असेलच. तसंच काहीसं प्रकरण समोर आलं आहे. चक्क एका कुत्र्यानं सिंहाला घाबरवलं आहे. सिंह हा जंगलातील सर्वात खतरनाक प्राणी म्हणून ओळखला जातो. असं म्हणतात की, एकदा का सिंहाने हल्ला केला की खुद्द यमराज देखील त्या प्राण्याला वाचवू शकत नाही. त्यामुळेच सिंहाला जंगलाचा राजा म्हटलं जातं.परंतु तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल हा राजा देखील राज्याबाहेर जाताच घाबरतो. भटक्या कुत्र्यांना घाबरून सिंहाने धूम ठोकल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

‘क्या शेर बनेगा रे तू’

व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ गुजरातमधील गीर सोमनाथ गावचा असल्याचं सांगितलं जात आहे. यामध्ये एक सिंह रात्रीच्या अंधारात भक्षाच्या शोधात गावात शिरताना दिसत आहे. यादरम्यान गावातील भटके कुत्रे सिंहावर हल्ला करतात. या सिंहाला पाहून कुत्रे बिलकूल घाबरले नाही उलट त्यांनी सिंहाला जोरदार प्रत्युत्तर दिल्याचं दिल्याचं दिसत आहे. वाघ, चित्ता आणि बिबट्यासारखे जंगलातील भयानक शिकारी प्राणी सिंहाला येताना पाहून आपला मार्ग बदलतात. अशा परिस्थितीत कुत्र्यासमोर आपला जीव वाचवून पळून जाणाऱ्या सिंहाला पाहणं हे कोणासाठीही आश्चर्यकारक आहे.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – देसी जुगाड! उंच झाडावर आरामात चढण्यासाठी बनवली स्कूटर; video पाहून म्हणाल…

सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून नेटकरी अनेक गमतीशीर प्रतिक्रिया व्हिडीओवर देत आहेत. तर काहीजण सिंह पळून गेल्याचं पाहून हैराण झाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 23-03-2023 at 14:12 IST

संबंधित बातम्या