scorecardresearch

Video Viral: ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ गाण्यावरचा चिमुकल्याचा डान्स एकदा बघाच!

पुष्पा चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या एका गाण्याच्या डान्स स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडीओ बनवले जात आहेत.

baby dance on srivalli
व्हायरल व्हिडीओ (Subhadeep Kantal/Facebook)

गेल्या काही दिवसांपासून अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा’ चित्रपट देशभर धुमाकूळ घालत आहे. या चित्रपटातील डायलॉग आणि डान्स स्टेप्सची सगळीकडे चर्चा आहे. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जेव्हापासून या चित्रपटाचे हिंदी व्हर्जन आले आहे, तेव्हापासून अशा व्हिडीओंची संख्याही वाढली आहे. चित्रपटातील ‘तेरी झलक अशरफी श्रीवल्ली…’ या एका गाण्याच्या डान्स स्टेप्सवर सर्वाधिक व्हिडीओ बनवले जात आहेत.

सध्या या गाण्याशी संबंधित एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्ही म्हणू शकाल की या गाण्याची क्रेझ आता चिमुकल्यांमध्येही दिसून येत आहे. एका चिमुकल्याचा श्रीवल्ली गाण्यावरचा हुक स्टेप करतानाचा एक व्हिडीओ भन्नाट व्हायरल झाला आहे.

(हे ही वाचा: ट्रकने ट्रॅक्टरला दिली जोरदार धडक, भीषण अपघाताचा video viral)

सुभदीप कंताल या फेसबुक युजरने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगा नाचताना दिसत आहे. टीव्हीवर श्रीवल्ली हे गाणे वाजत असताना, लहान मुलगा अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपची कॉपी करण्याचा प्रयत्न करत फिरतो.

(हे ही वाचा: हाच आहे सर्वधर्म समभाव! शाहरुख खानचा मॅनेजरसोबत अंत्यदर्शनावेळी प्रार्थना करतानाचा फोटो व्हायरल)

(हे ही वाचा: Viral: बिबट्याचा ‘हा’ व्हिडीओ पाहून लोकांचे धाबे दणाणले!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

व्हिडिओ ५५१ हजाराहून जास्त वेळा पाहिला गेला आहे आणि अनेक प्रतिक्रियाही त्या व्हिडीओला मिळाल्या आहेत. लोकांना लहान मुलाचा हा व्हिडीओ खूपच गोंडस वाटला. अनेकांनी कमेंट्स विभागात फक्त हार्ट इमोजीसह लहान मुलावर प्रेमाचा वर्षाव केला आहे. श्रीवल्ली देवी श्री प्रसाद यांनी संगीतबद्ध केली होती आणि गीते चंद्रबोस यांची आहेत. या गाण्याला यूट्यूबवर १५९ मिलियन पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-02-2022 at 14:00 IST