scorecardresearch

video : असावी सुंदर चॉकलेटची कार…’या’ चॉकलेट कारची इंटरनेटवर सुसाट एन्ट्री

video viral : एक चॉकलेट कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये चॉकलेट कारनं सुसाट एन्ट्री घेतली आहे.

video viral chocolate electric car
चॉकलेट कारची सुसाट एन्ट्री (सौजन्य – लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

chocolate electric car: असावा सुंदर चॉकलेटचा बंगला…चंदेरी, सोनेरी चमचमता चांगला…हे बालगीत आजही आपल्या लक्षात आहे. चॉकलेट हा सगळ्यांचाचं जिव्हाळ्याचा विषय आहे. चॉकलेटला सहसा कुणी नाही म्हणत नाही. चौकलेटमध्येही आता असंख्य फ्लेवर आले आहेत. चौकलेटपासून शेफ वेगवेगळ्या क्रिएटिव्हीटी करत असतात. ते पाहिल्यावर खरचं हे चॉकलेट आहे का? असा प्रश्न पडतो. असाच एक चॉकलेट कारचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. यामध्ये एका चॉकलेट कारनं सुसाट एन्ट्री घेतली आहे.

कशी बनवली ‘चॉकलेट कार’ –

या व्हिडीओमध्ये तो शेफ सुरुवातीला एका सपाट बटर पेपरवर मेल्ट केलेलं चॉकलेट पसरवताना दिसत आहे. त्यानंतर दुसऱ्या बटर पेपरवर कारचं पूर्ण डिझाईन काडून घेतलं आणि चॉकलेटला कारच्या विविध पार्टचा आकार दिला. अतिशय हळूवारपणे व्यवस्थित फिनीशिंगसह तो चॉलेटला आकार देत आहे. चॉकलेटपासून तयार केलेले कारचे सर्व पार्ट तो जोडून घेतो. कारचं मॉडेल बनवतो यानंतर कारला हव्या असणाऱ्या कलरचं चॉकलेट घेऊन “चॉकलेट कार” कव्हर तयार करतो. सर्वात शेवटी नंबर प्लेट लावून चॉकलेट कार पूर्ण करतो. यानंतर दिसणारी ही कार चॉकलेटपासून बनवली आहे यावर विश्वासचं बसत नाही.

पाहा व्हिडीओ –

हेही वाचा – वजन कमी करण्यासाठी भात योग्य की चपाती? जाणून घ्या कसा असावा आहार

या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये शेफनं ही ‘चॉकलेट कार’ बनवणं दिसतं तितक सोपं नसल्याचं म्हंटलं आहे. हा व्हिडीओ चॉकलेट प्रेमींच्या चांगलाच पंसतीस उतरला आहे. ‘चॉकलेट कार’च्या व्हिडीओला आतापर्यंत 5 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. Hyundai USA या ऑटोमोबाईल कंपनीनेही या व्हिडीओवर एक गोड राइड अशी कमेंट केली आहे. हा शेफ त्याच्या @amauryguichon नावाच्या इंस्टाग्राम पेजवर अश्या वेगवेगळ्या पाककृतींचे अनेक व्हिडीओ शेअर करत असतो.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 17-03-2023 at 12:27 IST