Video Wife Caught Husband Cheating: घरातली भांडणं घरात ठेवावीत बाहेर आणली की वाद हात पाय पसरू लागतो असं आधीच्या पिढीत म्हटलं जायचं. आताही हे वाक्य तितकंच खरं आहे, अलीकडे फक्त वाद घराच्या बाहेर आला की त्याचा व्हिडीओ व्हायरल होतो. अशाच एका जोडप्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओच्या कॅप्शनवरून तरी हे विवाहबाह्य संबंधांचं प्रकरण असून यात पत्नीने पतीला अन्य महिलेसह पकडल्याने जोरदार भांडण झाल्याचं समजतंय. @gharkekalesh या X अकाउंटवर सदर व्हिडीओ पोस्ट करण्यात आला होता, नेमका हा वाद कुठे झाला व व्हिडिओमध्ये दिसणारं जोडपं कोण आहे याची माहिती शेअर करण्यात आलेली नाही. पण ज्या पद्धतीने ही महिला आपल्या पतीला व नंतर त्याच्या बरोबर पकडलेल्या अन्य महिलेला चोप देतेय ते बघून नेटकरी हा व्हिडीओ व्हायरल करत आहेत.

कॅप्शनमध्ये म्हटल्याप्रमाणे, एका महिलेने मॉलमध्ये आपल्या पतीला एका अन्य महिलेसह फिरताना पाहिल्यावर तिचा पारा चढला होता. तिने थेट नवऱ्यासमोर जाऊन त्याला जाब विचारला आणि तिथेच त्याला कानशिलात लगावली. मारताना तिचा राग इतका अनावर झाला होता की तिलाच भान राहिलं नव्हतं त्याच गडबडीत तिच्या हातातील पर्स सुद्धा खाली पडली. मारून झाल्यावर ती स्वतः आपली बॅग उचलून तिथून निघून जात होती. जाता जाता तिचं लक्ष आपल्या पतीबरोबर दिसलेल्या महिलेवर गेल्याने तिने तिचे सुद्धा केस धरून तिला खाली पाडलं.

lokmanas
लोकमानस: नेतान्याहूंची स्थिती कात्रीत अडकल्यासारखी
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
misbehavior at toll booth where can you complaint how to deal with toll employees nhai fastag helpline
टोल नाक्यावरील कर्मचारी तुमच्याबरोबर चुकीच्या पद्धतीने वागले तर काय कराल? वाचा सविस्तर
Counselling how to break up without revenge
समुपदेशन : नातं तोडायचंय? पण सूडाशिवाय…

व्हिडिओमध्ये पुढे पुरुष खाली पडलेल्या महिलेला उठण्यासाठी मदत करताना दिसतो आणि मग ते दोघे निघून जातात. नेमकं हेच कारण आहे का हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही पण कमेंटमध्ये सुद्धा अनेकांनी हे ‘पती पत्नी और वो’ प्रकरण असल्याचं म्हटलं आहे.

हे ही वाचा<< भारतीय तरुणाला दिवसाचा पगार ५ कोटी, नावाचा जगभर डंका; आई वडिलांची इच्छा होती PhD करावी पण त्यानं..

दरम्यान, अशाप्रकारे पती पत्नीच्या वादाचा व्हिडीओ समोर येण्याचं हे पहिलं प्रकरण नाही. यापूर्वी अनेकदा कधी बेभान जोडप्यांचा रोमान्स तर कधी भांडण ऑनलाईन व्हायरल झालं आहे. हा व्हिडीओ सुद्धा चर्चेत येण्याआधी काहीच दिवसांपूर्वी उत्तर प्रदेशातील एका जोडप्याची अनोखी कहाणी व्हायरल होत होती. पत्नीने पोलिसांकडे धाव घेत आपल्या पती विरुद्ध तक्रार केली होती. आधी पती आठवड्यातून दोनदा आपल्यासाठी मोमोज आणायचा पण आता आणत नाही अशी या महिलेची तक्रार होती.