Waterless Toilet Poop Burning: सोशल मीडियावर कधी काय जुगाड व्हायरल होईल याचा अंदाज लावणे हे आता शक्य नाही. तुम्ही कधी विचार केला नसेल असा एक विचित्र पण तितकाच थक्क करणारा व्हिडीओ सध्या समोर येत आहे @vanwives नावाच्या इंस्टाग्राम पेजने अनोख्या वॉटरलेस टॉयलेटची क्लिप शेअर केली आहे. हे ‘पर्यावरणपूरक’ टॉयलेट एक बटण दाबून चक्क विष्ठेची जाळून राख करते. विशेष म्हणजे जाळल्याने या विष्ठेचा दुर्गंध सुद्धा पूर्ण नाहीसा होतो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“तुम्ही कल्पना करू शकता की कोणीतरी तुम्हाला सांगेल की एक दिवस तुम्ही विष्ठा जाळू शकाल?” असे कॅप्शन देत हा व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. क्लिपच्या सुरुवातीला, एक महिला हे तंत्रज्ञान कसे काम करते हे दाखवते. आपण नेहमीप्रमाणे टॉयलेटचा वापर करण्याआधी त्यात या तंत्रासह येणारे लायनर घालायचे आहे आणि मग तुमचे काम झाल्यावर फ्लश सारखे बटण दाबायचे आहे. यानंतर पाण्याऐवजी हे तंत्र विष्ठा राखेत रूपांतरित करेल.

दरम्यान, इंस्टाग्राम पेजने काही दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर केला होता आणि तेव्हापासून त्याला २,६७,०००हून अधिक लाईक्स आणि ९ दशलक्षाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. क्लिपने इंटरनेट वापरकर्त्यांना थक्क केले आहे.

Video: विष्ठेची झाली राख

हे ही वाचा<< मुंबई लोकलमध्ये दोन जोडप्यांनी ओलांडल्या सर्व मर्यादा; Video पाहून नेटकरी म्हणतात,”लाज सोडली पण…”

दरम्यान, वेबसाईटनुसार, सिंड्रेला इन्सिनरेशन टॉयलेट खालून येणाऱ्या दाबाला उष्णतेसह एकत्रित करून विष्ठा जाळते. मग ताजी हवा निर्देशित केली जाते आणि एक्झॉस्ट गॅसेस फिल्टर केले जातात. सिंड्रेलामध्ये गॅस किंवा विजेसाठी टॉयलेट मॉडेल्स आहेत आणि त्यामुळे ऑन आणि ऑफ-ग्रीड गरजांसाठी पर्यावरणास अनुकूल कचरा विल्हेवाटीचे पर्याय दिले जातात.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video woman shows jugaad of waterless toilet turns poop into ash intrigues internet shocking trending today online viral svs
First published on: 28-03-2023 at 09:40 IST