Viral Video: शिक्षण संपल की, प्रवास सुरु होतो तो नोकरीचा. काही जण पुढे शिक्षण घेत नोकरीचा विचार करतात. तर काही जण शिक्षण संपवून नोकरीच्या नव्या टप्प्यात पदार्पण करतात. नोकरी हा आयुष्यातील अगदीच महत्वाचा टप्पा असतो. कारण – नोकरी मिळवण्याआधी प्रत्येकालाच एक मुलाखत द्यावी लागते. या मुलाखतीचा ताण प्रत्येक तरुण मंडळींच्या मनात असतो. नेमके कोणते कपडे घालवेत, रेझ्युमे बघून आपल्याला काय प्रश्न विचारले जातील, आपण प्रत्येक प्रश्नांची उत्तर कशी देणार आदी अनेक प्रश्न आपल्या मनात फेर धरून नाचू लागतात.

नोकरीसाठी सगळ्यात पहिला आपल्याला रेझ्युमे तयार करावा लागतो. काही वेळा रेझ्युमे अधिक आकर्षक दिसावा, आपण किती वेगळे आहोत हे सिद्ध करण्यासाठी अनेक जण त्यात खोटी माहिती, जास्त अनुभव, कौशल्यांबद्दल चुकीची माहिती सुद्धा लिहितात. तर आज सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने तिच्या रेझ्युमेमध्ये तिच्या छंदाबद्दल सांगताना डान्स (नृत्य) बद्दल नमूद केले होते. तर हा छंद पाहून तिला ऑफिसमध्ये डान्स करून दाखवण्यास सांगितले. एकदा पाहाच हा व्हायरल व्हिडीओ.

rajasthan bhilwara murder case
विवाहित महिलेबरोबर प्रेमसंबंध असल्याचा संशय, तरुणाचे अपहरण करून हत्या अन् मृतदेह…; अंगावर शहारे आणणारी घटना समोर!
Parenting, control, freedom, ideal parenting, parent child relationship, discipline, authority, family dynamics, , communication, conflict, grandparent influence, parental boundaries, chaturang article,
सांधा बदलताना : पालकत्वाच्या मर्यादा
Paranoid Personality Disorder, PPD, personality disorders, behavioral patterns, mental health, psychotherapy, DSM-5, family dynamics, trust issues, mental illness, symptoms, treatment, chaturang article,
स्वभाव – विभाव : ते असे का वागतात?
Loksatta  Chaturang A trail of fear Experience the body
भय भूती : …आणि भीतीचा मागमूसही उरला नाही!
Don't believe these 5 myths about IVF
ईशा अंबानीने IVF द्वारे जुळ्या मुलांना दिला जन्म: IVFबाबत या ५ गैरसमजांवर विश्वास ठेवू नका
Meta AI in whatsapp
Meta AI in WhatsApp: आता AI थेट तुमच्या व्हॉट्सअ‍ॅपवर; वाट्टेल ते विचारा, ते सगळं सांगेल! वाचा नेमकं वापरायचं कसं?
Women Foxcon
सौभाग्य जपून बेरोजगार व्हायचं की आधुनिक राहून काम करायचं? बायानों, काय पटतंय तुम्हाला?
Supriya sule on dhonde jevan
“मुलीच्या किंवा मुलाच्या आई-वडिलांना पाय धुवायला लावू नका, त्याऐवजी…”, धोंडी जेवणाबाबत सुप्रिया सुळेंची कळकळीची विनंती!

हेही वाचा…हिंमत म्हणावी की काय? रेस्टॉरंटमध्ये शिरला अन् ‘त्याने’ तो फोन चोरला; CCTV फुटेज होतोय व्हायरल

व्हिडीओ नक्की बघा…

अनेकदा रेझ्युमे बनवताना वाचन, चित्रपट पाहणे, नृत्य करणे, गाणे गायला आवडणे आदी गोष्टींचा तरुण मंडळी रेझ्युमेमध्ये समावेश करतात. तर व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, तरुणीने रेझ्युमेमध्ये तिचा छंद डान्स लिहिला होता म्हणून तिला डान्स करण्यास सांगितले असे कॅप्शनमध्ये नमूद केलं आहे. तर तरुणी एका रूममध्ये नाचताना दिसत आहे. तर रूममध्ये बसलेले सर्वजण तिचा डान्स पाहत आहेत. म्हणजेच सुदैवाने, तिने तिच्या रेझ्युमेमध्ये तिला डान्स येतो असं खोटं नमूद केलं नव्हते. तसेच तिच्या खास डान्स कौशल्याचे शेवटी टाळ्या वाजवून कौतुक देखील करण्यात आले.

तरुणीने सोनम कपूरच्या भाग मिल्खा भाग या चित्रपटातील ‘ओ रंगरेझ’ या गाण्यावर डान्स सादर केला व या व्हिडीओला ‘POV: तुम्ही तुमच्या रेझ्युमेमध्ये तुमचा छंद “डान्स” आहे असे लिहिता’ ; अशी कॅप्शन या व्हिडीओला देण्यात आली आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ @Nikhilgupta1104 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ पाहून अनेक जण मजेशीर प्रतिक्रिया आणि त्यांच्या भावना कमेंटमध्ये मांडताना दिसून आले आहेत. एकूणच सोशल मीडियावर या व्हिडीओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.