scorecardresearch

Video: केस हायलाईट करायचा विचार करताय? आधी ‘या’ बाईची काय अवस्था झाली पाहा, डोक्यात जाळ

Viral Video: वेगळं दिसण्याचं किंवा रूप पालटण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमची हेअरस्टाईल बदलणे. अगदी कमी कष्टात तुम्हाला अनेक भन्नाट लुक करण्याची मुभा..

Video Women Hair Started Burning After Hair Treatment at Spa Gone Wrong Shocking Viral Clip
Video: केस हायलाईट करायचा विचार करताय? आधी 'या' बाईची काय अवस्था झाली पाहा (फोटो: इंस्टाग्राम)

Shocking Viral Video: आता सध्या लग्नाचा सीझन सुरु आहे, अशात प्रत्येकालाच आपण गर्दीत हटके दिसावं अशी इच्छा असते. वेगळं दिसण्याचं किंवा रूप पालटण्याचा सर्वात सोपा उपाय म्हणजे तुमची हेअरस्टाईल बदलणे. अगदी कमी कष्टात तुम्हाला अनेक भन्नाट लुक करण्याची मुभा तुमची हेअरस्टाईल देते. म्हणूनच खास सीझन असताना हेअरकट करण्यासाठी किंवा केसाला रंग करण्यासाठी, हायलाईट्ससाठी पार्लर्समध्ये गर्दी होऊ लागते. आता तुम्ही जाता त्या पार्लरमध्ये नीट सगळ्या गोष्टींची काळजी घेतली जात आहे का हे पाहणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण असं न केल्यास काय गंभीर परिणाम होऊ शकतो हे दाखवणारा एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे.

व्हायरल क्लिपमध्ये आपण पाहू शकता की, एक महिला जी एका ब्युटी पार्लरमध्ये केसाला कलर करण्यासाठी गेलेली दिसत आहे. यावेळी ब्युटिशयन काही केमिकल मिक्स करून तिच्या केसाला लावून ठेवतात. पण हे केमिकल बहुधा जास्त प्रमाणात पडल्याने या महिलेच्या स्कॅल्पला प्रचंड जळजळ जाणवू लागते. काहीच वेळात महिलेच्या डोक्यावर असा जाळ जाणवू लागतो की ती वेदनेने कळवळून उठते आणि घाबरून आरडा ओरडा करू लागते. तिला बघून सर्व ब्युटिशयन मंडळी सुद्धा भांबावून जातात.

शेवटी कसेबसे महिलेला शांत करून ब्युटिशियन तिला केस धुण्यासाठी घेऊन जातात पण जसे ते केसाला हात लावतात तशी त्या महिलेच्या केसाची एक एक बट सुटून हातात येऊ लागते. व्हिडिओच्या अगदी शेवटी जेव्हा थंड पाणी या महिलेच्या डोक्यावर पडते तेव्हा ती थोडी शांत झालेली दिसते पण कदाचित या प्रक्रियेत तिच्या केसाचे बरेच नुकसान झाले असणार.

केसाला कलर करायला गेली, घडलं भलतंच..

हे ही वाचा<< Video: ‘ती’ थरथरत होती पण ‘तो’ इतका गर्विष्ठ की..विमानात प्रवासी व हवाई सुंदरीमध्ये खडाजंगी; म्हणाला, “तू नोकर..”

हा व्हिडीओ इंस्टाग्रामवर @hairsalonfeed या अकाउंटवर शेअर करण्यात आला होता याला लाखो व्ह्यूज व ६८ हजाराहून अधिक लाईक्स आहेत. हा व्हिडीओ हसण्यावारी घेऊ नका. आपणही अशा प्रकारची कुठली ट्रीटमेंट घेणार असाल तर त्या ब्युटी पार्लरची स्वच्छताच नव्हे तर वापरलेल्या उत्पादनांची गुणवत्ता सुद्धा तपासून पाहायला विसरू नका.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 24-12-2022 at 08:59 IST
ताज्या बातम्या