Viral Video: आपल्याकडे अशी म्हण आहे, मस्करीची कुस्करी होईपर्यंत एखादा विनोद ताणू नये. मागील काही वर्षांमध्ये अनेक स्टॅन्ड अप कॉमेडियन हे स्वातंत्र्याच्या नावावर इतरांचा अनादर करताना दिसले आहेत. यावरून अनेक वाद अगदी दंगेही झाले आहेत. इंस्टाग्राम रीलवर सुद्धा अनेकदा मर्यादा ओलांडून कॉमेडी केली जाते. असाच काहीसा प्रकार सोशल मीडियावर सध्या व्हायरल होत आहे. प्राप्ती एलिझाबेथ या इंस्टाग्राम क्रिएटरने शाकाहारी मुलांविषयी केलेल्या टिपण्णीवरून तिला प्रचंड ट्रोल केले जात आहे. प्राप्तीने आपल्या एका डेटचा अनुभव सांगताना त्या तरुणावर केवळ तो शाकाहारी असल्याने केलेल्या कमेंट्स नेटकऱ्यांना आवडलेल्या नाहीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तर झालं असं की, प्राप्तीने आपल्या काही इकडच्या व्हिडिओमध्ये अनेक आक्षेपार्ह्य विधाने केली. “तुम्हाला पुरुषांकडून अजून निराशा होणार नाही असे वाटते तेवढ्यात कळतं की ‘तो’ शाकाहारी आहे. तुम्ही भाज्या खाणाऱ्या लोकांनी स्वतःसारखी दुसरी मुलगी शोधावी कारण मला तुमच्यात काहीच रस नाही, तुमचं नुकसान आहे” असं म्हणत प्राप्ती यात जोरजोरात हसताना दिसत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी एकापेक्षा एक कमेंट करून प्राप्तीचा खेळ तिच्यावरच उलटवला आहे .

Video: शाकाहारी पुरुष म्हणजे…

दरम्यान, या व्हिडिओला ३ लाखाहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. काहींनी यावर कमेंट करून प्राप्ती मॅडमचा खरपूस समाचार घेतला आहे.

हे ही वाचा<< बेभान नवरा बायकोने भररस्त्यात सोडली मर्यादा! बाळ समोर असताना… Video पाहून लोकं म्हणतात “अटक करा”

“सर्व शाकाहारी पुरुषांनी, विशेषत: जैन मुलांनी देवांचे आभार मानले पाहिजेत की या तांदळाच्या पिशवीने त्यांना नाकारले”, “आमचा विचार न केल्याबद्दल धन्यवाद. आदरपूर्वक, मांस खाणारी माणसे तुम्हाला मिळवू शकतात. या प्रयत्नासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. ” या दोन कमेंट्सना इंस्टाग्रामवर भरघोस लाईक्स मिळाल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Video women insulting vegetarian men with cheap sense of humor people call her indian aunty pro max have shame svs