घरात साधी पाल, झुरळ वगैरे दिसलं तरी आपल्याला किती भिती वाटते. त्यांना पाहून आपण सारं घर डोक्यावर घेतो, मग एखादा विषारी साप घरात ठाण मांडून बसला तर आपली परिस्थिती काय होईल हे वेगळं सांगायला नको. ‘साप’ नुसतं ऐकूनही अंगावर काटा येतो. त्याला प्रत्यक्षात पाहून काय गत होईल याची कल्पनाही करवत नाहीय! असंच काहीसं घडलं दक्षिण अफ्रिकेतील डर्बनमध्ये एका महिलेच्या बाबतीत.

तिच्या घरात चक्क ‘ब्लॅक माम्बा’ जातीचा साप ठाण मांडून बसला होता. सापच्या विषारी प्रजातीपैकी ही एक प्रजाती. तेव्हा त्याच्या दंशाने कोणाचाही जीव सहज जाऊ शकतो. या सापाला घरात शिरलेला पाहून या महिलने लगेच सर्पमित्राला फोन करून बोलावून घेतले. अर्थात त्याला कसं पकडायचं हे माहिती असल्याने सर्पमित्राने या सापाला घरातून बाहेर काढलं. ‘नॅशनल जिओग्राफीक’ चॅनलने या सापाच्या रेस्क्यू ऑपरेशनचा व्हिडिओ तयार केला आहे. समोर शत्रू दिसला की तोंड उघडून अधिक आक्रमक व्हायचं, शत्रूला हुलकावणी द्यायची आणि योग्य संधी साधून त्याच्यावर हल्ला करायचा हे या सापाचं वैशिष्ट्य.

त्याला पकडण्याचा प्रयत्न केलाच तर समोरच्याला कशी हुलकावणी देऊन पळ काढायच हे त्याला चांगलंच उपजत आहे. सर्पमित्राला या सापाच्या सवयी चांगल्याच माहिती असल्याने त्याने सहज या सापाला घराबाहेर काढला. विशेष म्हणजे कोणत्याही साधनांचा वापर न करता या सर्पमित्राने सापाला पकडलं. आता त्याने हे कसं साध्य केलंय हे पाहण्यासाठी मात्र तुम्हाला व्हिडिओ पाहावा लागेल.

सौजन्य – नॅशनल जिओग्राफीक