Shocking video: मॅगी खायला फक्त लहान मुलांनाच नाही, तर मोठ्यांनासुद्धा आवडते. बस दो मिनट…’ असे करीत ‘मॅगी’ तयार करणाऱ्या माधुरी दीक्षितची जाहिरात सर्वांनीच पाहिली असेल. मात्र, ‘मॅगी’ आपल्या शरीरासाठी खूप घातक आहे. अशातच सध्या समोर आलेल्या व्हिडीओवरून दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ लहान मुलांसह मोठ्यांच्या आरोग्यालाही महाग ठरणार असल्याचे दिसत आहे. जबलपूरमधील एका ग्राहकाने दावा केला आहे की, एका किराणा दुकानातून विकत घेतलेल्या मॅगी नूडल्समध्ये जिवंत किडे होते. याचा किळसवाणा व्हिडीओही सध्या सगळीकडे व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही मॅगी खाताना शंभर वेळा विचार कराल.

नेमकं काय घडलं ?

मॅगीची पॅकेजिंग तारीख मे २०२४ होती आणि एक्स्पायरी तारीख जानेवारी २०२५ होती. मॅगीमध्ये किडे आढळल्यानंतर ग्राहकाने राष्ट्रीय ग्राहक मंचाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याने सांगितले की, मॅगी पाण्यात टाकल्यावर किडे पाण्यावर तरंगू लागले. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. माहितीनुसार, मध्य प्रदेशमधील बालाघाट जिल्ह्यातील कटंगी शहरात राहणाऱ्या अंकित सेंगरने तीन दिवसांपूर्वी पारस पतंजली स्टोअरमधून मॅगी नूडल्स खरेदी केले होते. ही मॅगी पाण्यात टाकल्यावर किडे तरंगू लागले. त्यानंतर त्याने किराणा दुकानदाराशी संपर्क साधला.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका भांड्यात पाणी आहे आणि त्यात मॅगी आहे. यावेळी त्या पाण्यावर किडे फिरताना दिसत आहेत. हे किडे जिवंत असून, ते पाण्यातच इकडे- तिकडे फिरत आहेत. त्यामुळे दोन मिनिटांत तयार होणारी ‘मॅगी’ मम्मी-पप्पांना अन् बच्चे कंपनीला द्यावीशी वाटत असली तरी आरोग्य लक्षात घेता, खाताना नक्कीच विचार करावा लागेल. ‘मॅगी’सारखे अनेक खाद्यपदार्थ बाजारात मोठ्या प्रमाणात मिळत आहेत. टिव्हीवर दिसणाऱ्या आकर्षक जाहिरातींना बळी पडून आपण दोन मिनिटांत आपल्या आरोग्याचे अनारोग्य करण्यास कारणीभूत ठरतो की काय, याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “नाच रे मोरा आंब्याच्या वनात” बुलाढाण्याच्या जिल्हा परिषद शाळेत सरांचा जबरदस्त डान्स; VIDEO एकदा पाहाच

हा मुद्दा मध्यप्रदेशातच नव्हे, तर देशभर चर्चेचा विषय बनला आहे. मॅगीसारख्या लोकप्रिय खाद्यपदार्थांतील गुणवत्तेच्या अभावामुळे ग्राहकांच्या विश्वासाला तडा जाऊ शकतो. ‘मॅगी’ नूडल्ससारख्या उत्पादनात ‘मोनोसोडियम ग्लुटामेट’बरोबर शिशाचे प्रमाण अधिक असणे हे आरोग्यास धोकादायक ठरणारे आहे. लहान मुलांमध्ये ‘मॅगी’ नूडल्सची क्रेझ अधिक आहे. अनेकदा घरी नाश्त्यामध्ये अथवा सायंकाळी किंवा टिफिनमध्ये ‘मॅगी’ खायला दिली जाते. ती मुलांच्या आरोग्यास घातक असल्याचे डॉक्टर म्हणणे आहे.