Wayanad landslides : केरळच्या वायनाड जिल्ह्याला मंगळवारी पहाटे भूस्खलनाचा तडाखा बसला. आतापर्यंत या आपत्तीत १५० हून अधिक लोकांनी आपला जीव गमावला असून २०० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. बाधित भागात बचावकार्य सुरू आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर वायनाडच्या विनाश दर्शवणारे व्हिडिओंनी व्हायरल होत आहे. दरम्यान भूस्खलनाच्या सहा महिन्यांपूर्वी वायनाडचे सौंदर्य दर्शविणारे व्हिडीओ सध्याचा चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सहा महिन्यांपूर्वी किती सुंदर होते वायनाड

कंन्टेट निर्माता मुहम्मद रशीद टीपी यांनी असाच एक व्हिडिओ शेअर केला आहे जो साधारण सहा महिन्यांपूर्वी शूट करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये लोकप्रिय असलेला मुंडक्काई भागातील लाकडी पूल दाखवतो. हाच व्हिडिओ भूस्खलनामुळे झालेला विनाश दाखवतो. अनावश्यक प्रवास टाळा, वायनाडसाठी प्रार्थना करा, केरळसाठी प्रार्थना करा, असे म्हणत रशीदने व्हिडिओ शेअर केला आहे.

हेही वाचा – कोयत्याने वार करून व्यक्तीची निघृण हत्या, Video मुंबईतील असल्याचा दावा खोटा, मुंबई पोलिसांनी केले अफवांचे खंडन

व्हिडीओ पाहन भावूक झाले नेटकरी

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना एका यूजरने लिहिले की, “इतकी सुंदर जागा जी एका क्षणात अस्तित्वात नव्हती.” इतर अनेक वापरकर्त्यांनी जीवितहानीबद्दल शोक व्यक्त केला.

इन्स्टाग्राम पेज @rainbowmedia_ द्वारे शेअर केलेला आणखी एक व्हिडिओ वायनाडच्या मुंडक्काई प्रदेशातील नयनरम्य लँडस्केपच्या ड्रोनद्वारे शुट केलेले दृश्य दर्शवतो आणि नंतर भूस्खलनाने या प्रदेशातील सर्व काही कसे नष्ट केले हे दर्शविते. व्हिडिओ कॅप्शनसह पोस्ट करण्यात आला होता, “मुंडक्काई, वायनाड येथे मोठी भूस्खलनाची दुर्घटना. वायनाडसाठी प्रार्थना करा. ”

हेही वाचा – ४० रुपयांचा उपमा १२० रुपयांना, ६० रुपयांची इडली १६१ रुपयांना…,’ घरबसल्या जेवण मागवणे पडतेय महागात, व्यक्तीने हॉटेलच्या बिलाची केली तुलना

पीएम मोदींनी व्यक्त केला शोक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मृतांच्या नातेवाईकांना २ लाख रुपये आणि जखमींना ५० हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे. “वायनाडच्या काही भागात भूस्खलनामुळे व्यथित झालेल्यांनी आपले प्रियजन गमावले आहेत त्या सर्वांच्या दुखात मी सामील आहे आणि जखमींसाठी मी प्रार्थना करतो. सर्व बाधितांना मदत करण्यासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे.

केरळचे मुख्यमंत्री श्री @pinarayivijayan यांच्याशी बोललो आणि तेथील प्रचलित परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्राकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले, ”पीएम मोदींनी X वर लिहिले.

केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी लोकांना २०१८ च्या पुरानंतर राज्यातील उध्वस्त झालेल्या उपजीविकेच्या पुनर्बांधणीसाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आणि दोन दिवसांचा राज्य शोकही जाहीर केला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Videos showing famous wooden bridge landscape before and after go viral snk
Show comments