Vietnamese food blogger tastes panipuri for the first time; The reaction is going viral | Loksatta

Viral Video : व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच चाखली पाणीपुरीची चव; रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल

या व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पाणीपुरी खाल्ल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली आहे ती आता व्हायरल झाली आहे.

Viral Video : व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच चाखली पाणीपुरीची चव; रिअ‍ॅक्शन होतेय व्हायरल
या व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पाणीपुरी खाल्ल्यानंतर जी प्रतिक्रिया दिली आहे ती आता व्हायरल झाली आहे. (Instagram)

भारतीय म्हणून आपल्याला आपल्या पदार्थांमधील वैविध्येचा अभिमान आहे. प्रत्येक राज्याची स्वतःची अशी वेगळी खासियत आहे. येथे कित्येक व्यंजने आपल्याला चाखायला मिळतील. मात्र चाट पदार्थांमध्ये पाणीपुरी सर्वांत जास्त प्रसिद्ध आहे. असा क्वचितच कोणी असेल, ज्याला पाणीपुरी आवडत नसेल. भारतातील अनेक राज्यांमध्ये पाणीपुरीचे वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात.

देशातच नाही तर जगातील अनेक देशातील लोकही पाणीपुरीचे चाहते आहेत. नुकतंच एका व्हिएतनामी फूड ब्लॉगरने पहिल्यांदाच पाणीपुरीची चव चाखली आहे. पाणीपुरी खातानाचा एक व्हिडीओ त्याने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला असून पाणीपुरी खाल्ल्यानंतर त्याने जी प्रतिक्रिया दिली आहे ती आता व्हायरल झाली आहे. हा व्हिडीओ आतापर्यंत ३ लाखांहून अधिकवेळा पाहिला गेला आहे.

Viral Video : गाय आणि वासराने पाणीपुरीवर मारला ताव; नेटकरी म्हणतात, “यांनी तर मुलींनाही…”

या फूड ब्लॉगरचे नाव क्वांग ट्रॅन असे असून तो आपल्या व्हिडीओमध्ये पाणीपुरी खाताना दिसत आहे. यावेळी तो स्वतः पाणीपुरी तयार करत आहे आणि खात आहे. पाणीपुरी खाल्ल्यानंतरच्या त्याच्या प्रतिक्रिया अतिशय मजेशीर आहेत. त्याला पाणीपुरीची चव खूपच जास्त आवडली असून तो एकेक करून पाणीपुरी बनवत आहे आणि खात आहे.

पाणीपुरी खाल्ल्यानंतरची क्वांग ट्रॅनची प्रतिक्रिया नेटकऱ्यांना खूपच आवडली आहे. नेटकऱ्यांनी त्याच्या व्हिडीओवर अनेक कमेंट्सही केल्या आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Next Story
गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या, जगातील सर्वांत वयस्कर श्वानाचे निधन; त्याच्या दीर्घायुष्याचे रहस्य काय? जाणून घ्या

संबंधित बातम्या

कर्म तैसे फळ! मोराच्या अंड्यांची चोरी करायला गेलेल्या चोराला घडली जन्माची अद्दल; पाहा Viral Video
वाह रे पठ्ठ्या! डोकं धुण्यासाठी खरं ‘डोकं’ लावलंस, Viral Video पाहून नेटिझन्स म्हणाले, ही तर ‘5G Technology’
चक्क डोक्यावर बाइक घेऊन तो बसवर चढला अन्…; थक्क करणारा Viral Video एकदा पाहाच
Zombie Virus: रशियात सापडला ४८ हजार ५०० वर्षांपूर्वीचा ‘झोम्बी व्हायरस’; करोनापेक्षाही भयंकर संसर्ग लाटेची वैज्ञानिकांना भीती
Video: लग्नाच्या वरातीत नाचताना ‘तो’ खाली कोसळला; बायको उचलायला गेली तर अवघ्या ५ सेकंदात…

व्हिडिओ

ताज्या बातम्या
“…तर आता यांच्या पोटात गोळा यायला लागला”, उद्धव ठाकरेंचं राज ठाकरेंवर टीकास्र
“…तर तुम्ही मूर्ख, खोटारडे आणि ढोंगी आहात” उद्धव ठाकरेंवरील ‘त्या’ आरोपांवरून राऊतांचा भाजपावर घणाघात
पुणे: गडकिल्ले संवर्धनासाठी दोन वर्षांनंतर समित्या स्थापन
पुणे: नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; ट्रकची मालवाहू गाडीला धडक; सात जण जखमी
“आजच्या गद्दारीची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेशी केली”, उद्धव ठाकरेंचा मंगलप्रभात लोढांसह शिंदेंवर हल्लाबोल