scorecardresearch

Photos : शिक्षणमंत्री विनोद तावडेंच्या मुलीचा स्टायलिश अंदाज

वडिलांसोबत अन्वीनेसुद्धा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये अन्वीच्या स्टायलिश अंदाजाने सर्वांचं लक्ष वेधलं.

vinod tawde, anvee tawde
विनोद तावडे, अन्वी तावडे

राज्याचे शिक्षणमंत्री आणि भाजपाचे नेते विनोद तावडे यांची मुलगी अन्वी तावडेचा फॅशन सेन्स सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. रंगवलेले केस असो किंवा टोचलेले नाक, अन्वीचं अनोखं फॅशन सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोंमध्येही पाहायला मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात देशभरातील ७१ जागांसाठी सोमवारी सकाळी मतदानाला सुरुवात झाली. वडिलांसोबत अन्वीनेसुद्धा मतदानाचा हक्क बजावला. यावेळी समोर आलेल्या फोटोंमध्ये अन्वीच्या फॅशन स्टाइलनेच सर्वांचं लक्ष वेधलं.

अन्वी पुण्यातील ‘सिम्बॉयसिस स्कूल फॉर लिबरल आर्ट्स’मध्ये शिक्षण घेत आहे. तिच्या फेसबुक अकाऊंटवरही बरेच फोटो पाहायला मिळत आहेत. हे फोटो पाहून अन्वीला हेअर कलर करणं फार पसंत असल्याचं समजतंय. कारण विविध प्रकारे तिने केस रंगवल्याचे अनेक फोटो तिच्या फेसबुक अकाऊंटवर आहेत. इतरांचे अनुकरण करण्यापेक्षा आपलीच स्वतंत्र शैली निर्माण करून काही वेगळे करण्याच्या अन्वीच्या या फॅशनमध्ये नाकातली चमकी व नथनीसुद्धा पाहायला मिळत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 29-04-2019 at 12:53 IST
ताज्या बातम्या