Viral Video: तुम्ही मस्त खरेदीसाठी सुपरमार्केटमध्ये गेल्यावर तुमच्या बाजूच्या काउंटरवर एखादा अस्वल ग्राहक म्हणून आलेला दिसला तर? नाही नाही अस्वलाचा नकली ड्रेस घालून आलेला माणूस नाही खराखुरा अस्वल! काही धांदळ उडेल ना? पण असा प्रकार खरोखरच घडला आहे.कॅलिफोर्नियाच्या ऑलिम्पिक व्हॅलीमध्ये भुकेले तपकिरी अस्वल सेव्हन- इलेव्हन स्टोअरमध्ये घुसले आणि चिप्स- कँडी भागात जाऊन चक्क खरेदी करू लागलं. खरेदी कसली उलट सरळ त्याने दुकानातून उचलून खायला सुरुवात केली होती. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

ऑलिम्पिक व्हॅलीमधील स्टोअरमध्ये रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करणाऱ्या कॅशियर क्रिस्टोफर किन्सन याने डेली मेलला सांगितल्यानुसार अचानक रात्रीच्या वेळी दार उघडलेले दिसले अर्थात घाबरून गेल्यावर त्यांनी आधी दुकानात शोधाशोध सुरु केली. नंतर लक्षात आले की, एक तपकिरी अस्वल रात्री उशिरा भूक लागली म्हणून दुकानात आले होते. विशेष म्हणजे हे अस्वल व्हिडिओपेक्षा प्रत्यक्षात २०% ते ३०% मोठे होते.

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
Sensex Nifty gains higher as a result of mineral oil prices
तेलाच्या भडक्याने ‘सेन्सेक्स-निफ्टी’च्या दौडीला पाचर
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video

Video: जंगलाचा नवा राजा झेब्रा होणार का? बलाढ्य सिंह अक्षरशः रडकुंडीला आला, पाहा थरार

पुढे किन्सन म्हणाला की मी अस्वलाला त्रास द्यायला किंवा डिवचयाला गेलो नाही, मी मागचा दरवाजा उघडा ठेवला होतो जेणेकरून त्याने हल्ला केल्यास पळून जाता येईल पण ते अस्वल फक्त खाण्यासाठी आले होते आणि त्याला माझ्यात नाही तर कॅण्डीमध्येच जास्त रस होता. एकदा खाऊन झाल्यावर हे अस्वल निघून गेले होते पण पुन्हा भूक लागल्यावर अर्ध्या तासाने ते पुन्हा आले होते.

अस्वलाचा व्हायरल व्हिडीओ

Video: १४ सिंहिणींचा एका हत्तीवर हल्ला; बुद्धिमान गजराजांनी असं काही केलं की बघून तुम्हीही म्हणाल वाह्ह

दरम्यान हा व्हिडीओ शेअर झाल्यापासून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अस्वलाला काही जणांनी चोर म्हटलंय तर काहींनी त्याला भूक लागली होती मग तो तरी काय करेल आणि कँडी बघून आपल्याला राहावत नाही मग अस्वल तर प्राणी आहे असे म्हणत काहींनी अस्वलाचीच बाजू घेतली आहे.