शुक्रवारी दुबईमध्ये अफगाणिस्तान विरुद्ध पाकिस्तानच्या सुपर १२, ग्रुप २ च्या सामन्यात असिफ अलीने एमएस धोनीच्या सेलिब्रेशन स्टाईल प्रमाणे सेलिब्रेशन केलं. आवश्यक रेट आधीच १० पेक्षा जास्त असताना कठीण परिस्थितीत फलंदाजीला येऊनही, त्याने संयम राखला. पाकिस्तानच्या पाच विकेट्सने विजयावर शिक्कामोर्तब केले. आणि षटकारासह विजयी धावा ठोकल्यानंतर, धोनीने त्याच्या कारकिर्दीत अनेक वेळा केले होते तसं, असिफ अलीने गन-शॉट सेलिब्रेशन केले. होय, तोच बंदुकीच्या गोळीचा उत्सव, जो धोनीने २००५ मध्ये जयपूरमध्ये श्रीलंकेविरुद्ध शतक झळकावल्यानंतर केला होता.

आसिफच्या सेलिब्रेशनमध्ये आणि धोनीने १६ वर्षांपूर्वी तिसर्‍या भारत विरुद्ध श्रीलंका एकदिवसीय सामन्यात जे साम्य केले होते ते चाहत्यांनी लगेच समजले. धोनीने नाबाद १८३ धावा केल्या होत्या – एकदिवसीय क्रिकेटमधली त्याची सर्वोच्च धावसंख्या होत्या. भारताला २३ चेंडू बाकी असताना २९९ धावांचे लक्ष्य पूर्ण करण्यात मदत झाली. आसिफने शतक झळकावले नाही पण त्याने ज्या पद्धतीने फलंदाजी केली, त्यामुळे तो लवकरच तेथे पोहोचेल. त्याने लगेचच बॅटचा वापर करून ‘बंदूक’ बनवली आणि पाकिस्तानचा विजय साजरा केला.

Suresh Raina Helps Limping ms dhoni Viral Video
IPL 2024: चालताना त्रास होणाऱ्या धोनीला सुरेश रैन्नाने दिला आधार, व्हीडिओ होतोय तुफान व्हायरल
Rohit sharma speech in Mumbai Indians Dressing Room Video MI vs DC
IPL 2024: ‘वैयक्तिक कामगिरी, विक्रम फारसे महत्त्वाचे नाहीत…’, रोहित शर्माने मुंबईच्या विजयानंतर ड्रेसिंग रूममध्ये खेळाडूंशी साधला संवाद
IPL 2024 Delhi Capitals vs Kolkata Knight Riders Match Updates in Marathi
IPL 2024 RCB vs LSG: अंगक्रिश रघुवंशीच्या पहिल्या अर्धशतकाचे खास सेलिब्रेशन कोणासाठी केले? सामन्यानंतर सांगितले
Hardik Pandya Reacts To Defeat
IPL 2024 : हैदराबादकडून पराभूत झाल्यानंतर हार्दिक पंड्याने दिली प्रतिक्रिया, सांगितले मुंबईच्या पराभवाचे सर्वात मोठे कारण

( हे ही वाचा: Viral Video : रोममध्ये पंतप्रधान अभिवादन करत असताना अचानक समोरची व्यक्ती म्हणाली, “नमस्कार, मी नागपूरचा!” )

यावर आता अनेक व्हिडीओ,पोस्ट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्या आहेत.

(हे ही वाचा: Photos: कुठे ‘सिंह’ तर कुठे ‘विमान’; अनोख्या डिझाइनच्या पाण्याच्या टाक्या बघितल्या का? )

(हे ही वाचा: मंगळसूत्राच्या ‘त्या’ जाहिरातीमुळे डिझायनर सब्यसाचीला कायदेशीर नोटीस )

या विश्वचषकात फक्त दोन डावात ७ षटकार ठोकणाऱ्या आसिफ अलीने ७ चेंडूत २५ धावा केल्या, ज्यात १९व्या षटकात अफगाणिस्तानचा मध्यमगती गोलंदाज करीम जनातविरुद्ध चार षटकारांचा समावेश होता, जेव्हा पाकिस्तानला १२ चेंडूत विजयासाठी २४ धावांची गरज होती.

पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम म्हणाला, “तो (असिफ अली) यासाठी ओळखला जातो. त्याने पीएसएल (पाकिस्तान सुपर लीग) मध्ये अनेक डाव खेळले आहेत. त्यामुळे मला पूर्ण विश्वास होता की तो आम्हाला कोणत्याही संकटातून बाहेर काढेल,” त्यांच्या संघाने गट २ गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहण्यासाठी विजयाची हॅट्ट्रिक केली.