Couple Trekking Viral Video: पुण्यातील लोहगड किल्ल्याजवळ घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणानंतर सोशल मीडियावर त्या संदर्भातील मीम्स, विनोदी व्हिडीओ आणि विविध प्रतिक्रिया मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. अशातच एका नवरा-बायकोचा व्हिडीओ इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरला आहे. सुरुवातीला हा एक साधा ट्रेकिंगचा व्हिडीओ वाटतो. दोघेही डोंगर-दऱ्यांचा आनंद घेत फिरताना दिसतात. पण, शेवटच्या काही सेकंदांत कॅमेऱ्यात असं काही कैद होतं की, नेटकऱ्यांनाही हसू आवरत नाही. नेमकं काय घडलं, जाणून घ्या…

साधा ट्रेकिंगचा व्हिडीओ… पण शेवटी घडलं काहीतरी वेगळंच

व्हायरल व्हिडीओमध्ये एक जोडपं डोंगराळ भागात फिरताना दिसतं. निसर्गरम्य परिसर, थंडगार वातावरण आणि निवांत फेरफटका… सर्व काही अगदी सामान्य असल्यासारखं वाटतं. दोघेही आनंदानं ट्रेकिंग करीत असल्याचं दिसतं.

मात्र, काही सेकंदांनी कॅमेरा अशा एका गोष्टीवर स्थिरावतो की, पाहणारेही क्षणभर थबकतात. सुरुवातीला अनेकांना नेमकं काय दिसलं, हेच समजत नाही. पण लक्षपूर्वक पाहिल्यानंतर संपूर्ण प्रकार लक्षात येतो आणि त्यानंतर कमेंट्सचा अक्षरशः पाऊस सुरू होतो.

चर्चेतील प्रकरणानंतर व्हिडीओची जोरदार चर्चा

अलीकडेच पुण्यातील लोहगड परिसरात घडलेल्या केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणाची देशभरात चर्चा सुरू आहे. पोलिसांनी या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून, तपास सुरू आहे. या घटनेनंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यावर विनोदी पद्धतीनं प्रतिक्रिया देत मीम्स आणि व्हिडीओ शेअर करण्यास सुरुवात केली.

हा व्हिडीओही त्याच चर्चेच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मात्र, या व्हिडीओचा त्या प्रकरणाशी प्रत्यक्ष संबंध असल्याचा कोणताही पुरावा नाही. सोशल मीडियावर तो केवळ विनोदी आशयानं व्हायरल होत आहे.

शेवटी समोर आलं खरं कारण…

व्हिडीओच्या शेवटी कॅमेरा त्या जोडप्याच्या हातांकडे वळतो. तेव्हा दिसून येतं की, पतीनं स्वतःचा हात पत्नीच्या हाताला एका कापडानं बांधून ठेवला आहे. हे दृश्य पाहताच अनेकांनी हसत हसत विविध प्रतिक्रिया दिल्या.

काहींनी हा प्रकार केतन अग्रवाल प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर केलेला विनोदी टोला असल्याचं म्हटलं; तर काहींनी तो केवळ मजेशीर कंटेंट असल्याचं सांगितलं.

नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडीओ एक्सवरील @magbhu55 या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. लाखो लोकांनी तो पाहिला असून, हजारो जणांनी लाईक आणि शेअर केला आहे.

एका नेटकऱ्यानं लिहिलं, “भाऊ आधीच सावध झाला दिसतोय.”

दुसऱ्यानं म्हटलं, “ट्रेकिंगला जाताना अशी आयडिया पहिल्यांदाच पाहिली.”

तर आणखी एका युजरनं विनोदी अंदाजात प्रतिक्रिया देत लिहिलं की, काहीही झालं तरी आता दोघेही एकत्रच!

येथे पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर तुफान व्हायरल

सध्या हा व्हिडीओ इंटरनेटवर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. अलीकडील चर्चेत असलेल्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अनेक जण तो शेअर करीत आहेत. काहींना हा व्हिडीओ केवळ मनोरंजनाचा भाग वाटत आहे; तर काहींनी तो सध्याच्या चर्चेवर मारलेला उपरोधिक टोला असल्याचं म्हटलं आहे.

त्यामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला असून, शेवटी दिसणारं ते दृश्य पाहून अनेकांना हसूही येत आहे आणि विचारही करायला भाग पाडत आहे.