Viral Dance Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यात काही व्हिडीओ क्षणार्धात तुमचे मनोरंजन करतात. काही तुम्हाला हसायला भाग पाडतात; तर काही असे व्हिडीओ असतात, जे तुमचे लक्ष वेधून घेऊन, तुमच्या मनावर कायमची छाप सोडतात. सध्या असाच एक डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात एक तरुणी बॉलीवूडमधील प्रसिद्ध गाणं ‘झल्ला वल्लाह’वर जबरदस्त डान्स करताना दिसतेय, तिचा डान्स पाहून नेटकरीही चकित झाले आहेत.

व्हिडीओमध्ये मुख्य आकर्षण केवळ तिचा डान्स नसून एकूणचं तिची स्टाईल आहे. तिने डेनिम जीन्स आणि गुलाबी रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. यावेळी नाचताना तिचा दिसून येणारा आत्मविश्वास आणि तिची नृत्यशैली यांमुळे साधा लूकही विशेष भासतो. व्हिडीओत ती तरुणी प्रसिद्ध बॉलीवूड गाणं ‘झल्ला वल्लाह’वर नाचताना दिसत आहे. गाणं सुरू होताच नृत्यादरम्यान तिच्या चेहऱ्यावर उमटणारे हावभाव आणि तिचा पदन्यास पाहण्यासारखा आहे.

ती गाण्याच्या प्रत्येक तालावर इतक्या सुंदरपणे नाचते की, पाहणाऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळून राहतात. तिची ऊर्जा आणि आत्मविश्वासच या व्हिडीओला इतरांपेक्षा वेगळे ठरवतो. केवळ तिचे नृत्यच नाही तर तिच्या चेहऱ्यावरील हावभावही लोकांना खूप आवडत आहेत. गाण्याच्या मूडनुसार बदलणाऱ्या तिच्या हावभावांमुळे तिचा परफॉर्मन्स अधिकच मनमोहक वाटतो.

तरुणीचा हा डान्स व्हिडीओ nikitakanwar_138 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे, जो पाहून अनेक जण तिचे कौतुक करीत आहेत. काहींनी तिच्या नृत्यशैलीची, तर काहींनी तिच्यातील अविश्वसनीय ऊर्जेची प्रशंसा केली. अनेकांनी अशा कमेंट्स केल्या की, इतक्या आत्मविश्वासानं आणि सहजतेनं नृत्य सादरीकरण करणं हे प्रत्येकाला जमत नाही. काहींनी तर असंही लिहिलं की, त्यांनी तो व्हिडीओ अनेक वेळा पाहिला; पण प्रत्येक वेळी त्यांना तो तितकाच आवडला.