वडील आणि मुलीचं नातं अत्यंत खास असतं. असं म्हणतात प्रत्येक वडीलाचं आपल्या लेकीवर जास्त जीव असतो आणि प्रत्येक लेकीचा आपल्या वडीलांवर जास्त जीव असतो. वडील आपल्या लेकीला अगदी फुलांसारखे जपतात, एखाद्या राजकुमारीसारखे सर्व हट्ट पूर्ण करतात आणि तिच्यावर जीवापाड प्रेम करतात. आपल्या लेकीसाठी कोणतेही वडील काहीही करायला तयार असतो. आपल्या लेकीच्या चेहर्यावरील हसू पाहण्यासाठी एक बाप कोणतेही गोष्ट करण्यासाठी मागे पुढे पाहात नाही. सध्या अशाच वडील आणि लेकीच्या सुंदर नात्याची झलक दाखवणारा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओ शाळेतील एका डान्स कार्यक्रमातील आहे जिथे चिमुकल्या मुलींबरोबर त्यांचे वडील डान्स करताना दिसत आहे. व्हायरल व्हिडीओमध्ये “मैं अगर कहूँ तुमसा हसीं कायनात मे नही हैं कही” गाण्यावर वडील आपल्या लेकीबरोबर डान्स करताना दिसत आहे. या गोंडस डान्सने लाखो नेटकऱ्यांचे मन जिंकले आहे. व्हिडिओ पाहून प्रत्येकाच्या चेहर्यावर हसू उमटले आहे.
आज काल अनेक शाळांमध्ये वार्षिक उत्सवामध्ये मुलांबरोबर पालकांनाही सहभागी केले जाते जेणेकरून मुलांचे आपल्या पालकांबरोबरचे नाते घट्ट होईल आणि मुलांच्या मनातील स्टेजची भीती दूर होईल. अगदी लहान वयापासून राबवल्या जाणाऱ्या या उपक्रमांमुळे मुलांच्या मनात आपल्या पालकांबद्दलचे प्रेम आणि आदर वाढतोच पण प्रक्षेकांसमोर स्टेजवर उभे राहण्याचा आत्मविश्वासही मिळतो. व्हायरल व्हिडिओने अनेकांना प्रेरणा दिली आहे.
u
u
हेही वाचा – “चिंची चेटकीण आली फ्रिजमध्ये”, लेकीला अद्दल घडवण्यासाठी आईने लढवली शक्कल, Viral Video पाहून पोट धरून हसाल
व्हायरल व्हिडिओ इंस्टाग्रामवर jyoti70656 नावाच्या पेजवर शेअर केला आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून व्हिडिओला १ लाख ९३ हजार पेक्षा जास्त लोकांनी पसंती दर्शवली आहे. नेटकऱ्यांनी कमेंट करून प्रतिक्रिया दिल्या आहे.
एकाने कमेंटमध्ये लिहिले की,”हा इंटरनेटवरील सर्वात सुंदर व्हिडिओ आहे.”
दुसर्याने लिहिले की,” प्रत्येक मुलीला असे वडील मिळाले पाहिजे”
तिसर्याने लिहिले की, “व्हिडिओ पाहून आत्म्याला शांती मिळाली”
चौथ्याने लिहिले की,”आजच्या पिढीतील मुलं खूप भाग्यवान आहे ज्यांना असे सर्वोत्तम वडील मिळाले आहेत.”
पाचव्याने लिहिले की,”व्हिडिओ पाहून अंगावर काटा उभा राहिला”