scorecardresearch

VIRAL VIDEO : माशाच्या तोंडात सिरिंज टोचल्यानंतर शेकडो पिल्ले बाहेर पडली! असं दृश्य तुम्ही कधीच पाहिलं नसेल!

माणूस असो वा प्राणी, प्रत्येक आई आपल्या पिल्लांना इतरांपासून वाचवण्यासाठी काही ना काही पर्याय शोधत असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येच अगदी असंच काहीसं दिसून आलं.

Mouthbrooding-Fish
(Photo: Instagram/ viralhog)

निसर्गाने जगातील प्रत्येक गोष्ट अतिशय खास आणि अद्वितीय बनवली आहे. माणूस असो वा प्राणी, पक्षी असो वा मासे आणि कीटक असोत की वनस्पती असो, प्रत्येक जीव स्वत:च्या रक्षणासाठी आणि पिल्लांच्या रक्षणासाठी कोणत्याही थराला जायला तयार असतो. माणसांप्रमाणेच प्राण्यांमधली आई सुद्धा आपल्या मुलांचं रक्षण करण्यासाठी आपल्या जीवाची बाजी लावतात. असे अनेक व्हिडीओ तुम्ही आतापर्यंत सोशल मीडियावर पाहिले असतील. पिल्लांचं रक्षण करण्यासाठी प्रत्येकाच्या बचावाच्या वेगवेगळ्या पद्धती असतात. अशाच एका आश्चर्यकारक माशाचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. हा व्हिडीओ पाहून तुम्ही सुद्धा चकित व्हाल.

माणूस असो वा प्राणी, प्रत्येक आई आपल्या पिल्लांना इतरांपासून वाचवण्यासाठी काही ना काही पर्याय शोधत असते. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्येच अगदी असंच काहीसं दिसून आलं. जिथे मानवाने बंदुका आणि शस्त्रे बनवली आहेत, तिथे अनेक मोठ्या प्राण्यांना निसर्गाने भयानक दात किंवा वेग दिला आहे, ज्याद्वारे ते आपल्या पिल्लांचे प्राण वाचवतात, परंतु आज आम्ही तुम्हाला अशा एका माशाबद्दल सांगणार आहोत, जे त्यांच्या पिल्लांचा जीव वाचवण्यासाठी एक अनोखा मार्ग वापरतात.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : सापाचे लागोपाठ वार आणि उंदराची अगदी ‘ब्रूस ली’ सारखी फाईट, पाहा कोणी मारली बाजी…

अलीकडेच ‘व्हायरल होग’ या प्रसिद्ध सोशल मीडिया अकाऊंटवरून हा व्हायरल व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, जो खूपच आश्चर्यकारक आहे. या व्हिडीओमध्ये पाण्याने भरलेल्या एका प्लास्टिकच्या बादलीत मासा पोहत असताना दिसून येत आहे. काही क्षणासाठी हा मासा पाहून तो जिवंत नसल्याचा भास होऊ लागतो. मात्र शेजारी बसलेल्या व्यक्तीने त्याला पकडण्याचा प्रयत्न करताच तो इकडे तिकडे पळू लागतो. त्यानंतर जे घडते ते अतिशय आश्चर्यकारक आहे.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : ‘त्या’ एअर होस्टेसवरही चढला ‘पुष्पा’ फिवर, ‘सामी सामी’ गाण्यावर केला रश्मिकापेक्षाही भन्नाट डान्स

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक माणूस बादलीतलं पाणी सिरिंजमध्ये भरत असल्याचं दिसून येत आहे. त्यानंतर तो आपल्या हाताने माशाला पकडण्याचा प्रयत्न करू लागतो. हा मासा सहजासहजी त्याच्या हाती लागत नाही. या व्यक्तीने माशाला पकडताच तो पाण्याने भरलेली सिरिंज माशाच्या तोंडात टाकतो.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : नवरीला घेण्यासाठी नवरदेव स्टेजवरून खाली आला, पुढे जे होतं ते पाहून तुम्ही म्हणाल, ‘किती क्यूट!’

माशाच्या तोडांत या सिरिंजने हळू हळू पाणी ओतताना क्षणभर वाटलं की माणूस काय विचित्र करतोय. पण काही वेळातच माशाच्या तोंडातून माशांची अनेक पिल्लं बाहेर पडतात. त्यांची संख्या इतकी आहे की त्यांची गणना करणे देखील कठीण आहे. या व्हिडीओवर लोकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. या व्हिडीओला ४० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

आणखी वाचा : राणू मंडलने गायलं ‘Kacha Badam’ गाणं, VIRAL VIDEO पाहिल्यानंतर लोक म्हणाले, ‘सगळा मूड खराब केला’

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Zomato डिलिव्हरी बॉयचा VIDEO VIRAL; माउथ ऑरगनने गाणं वाजवून झाला देशभरात फेमस!

या व्हिडीओमध्ये दिसणार्‍या माशाने पिल्लांना तोंडात का धरून ठेवले होते, असा प्रश्न तुम्हाला पडला असेलच. या व्हिडीओवरील कमेंटमध्ये काही लोकांनी लिहिलं की “ती मुलांना खायला जाणार आहे, म्हणून तिने हे केलं.” वास्तविक, दिसलेल्या माशाचे नाव सिचलिड्स आहे. हा मासा आफ्रिकेत सर्वाधिक आढळतो. त्यांच्या पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी हा मासा त्यांना तोंडात धरून ठेवतो. ती अंडी घालते तेव्हा सर्व अंडी तोंडात एकत्र ठेवते. २१ ते ३६ दिवस ती पिल्लांना तोंडात ठेवते आणि या दरम्यान ती काहीही खात नाही. अंड्यातून जेव्हा त्यांचं पिल्ले बाहेर येतात, तेव्हा धोका टळला आहे असं तिला वाटतं, तेव्हा ती त्यांना बाहेर काढते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral fish hold egg in mouth babies coming out of mouth cichlids video prp

ताज्या बातम्या