Viral Food Video: तुम्हाला पेस्ट्री आवडतात का? तुम्हाला वडा आवडतो का? माफ करा पण, तुमच्यासाठी ही माहिती त्रासदायक ठरू शकते. कारण नुकत्याच व्हायरल झालेल्या एका फूड व्हिडिओमध्ये चॉकलेट पेस्ट्री वडा तयार करण्यासाठी या दोन्हींचे फ्युजन केले आहे. हे फार विचित्र आहे, बरोबर ना? आजकाल सर्वत्र विचित्र फुड फ्युजनचा ट्रेंड सुरु झाला आहे. आतापर्यंत इंटरनेटवर चॉकलेट ऑम्लेट, आइस्क्रीम पाणीपुरी, चाउमीन ऑम्लेट आणि बरेच विचित्र फुड व्हायरल झाल्याचे आपण पाहिले असेल जे असामान्य पदार्थ एकत्र करुन तयार केले जातात.
स्ट्रीट फूड विक्रेत्याने तयार केला चॉकलेट पेस्ट्री वडा
आता एका स्ट्रीट फूड विक्रेत्याने या विचित्र फ्युजन फुडच्या यादीत नवीन पदार्थ जोडला आहे ज्याचे नाव आहे चॉकलेट पेस्ट्री वडा. व्हायरल झालेल्या फूड व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने स्वादिष्ट गोड पदार्थाचे कुरकुरीत वड्यामध्ये रूपांतर केले आहे ज्यासाठी त्याने बेसनाच्या मिश्रणात चॉकलेट केक टाकून तळला आहे. आता वडा खायचा कसा? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. इंटरनेटवर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ फूड ब्लॉगर चटोरे ब्रदर्सने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. फूड ब्लॉगरचे त्याच्या सोशल मीडिया हँडलवर १९० लाखांपेक्षा जास्त फॉलोअर्स आणि १९६० पोस्ट आहेत. चॉकलेट पेस्ट्री वड्याच्या व्हायरल फूड व्हिडिओला त्याने, सॉरी गाईस्स्स?,असे कॅप्शन लिहिले आहे.
एका नारळात घरीच बनवा व्हर्जिन खोबरेल तेल; केस, त्वचा ते अगदी जेवणातही करू शकता वापर
विचित्र फुड फ्युजनचा व्हिडिओ व्हायरल
चॉकलेट पेस्ट्री वड्याच्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे आणि हा व्हिडिओ नेटकऱ्यांना आजिबात आवडला नाही. व्हायरल फूड व्हिडिओवर अनेकांनी टीका केली आहे. एकाने कमेंटमध्ये विचारले आहे की, हे काय आहे. तर दुसऱ्याने म्हटले की, “डेझर्ट आणि स्नॅक्स मिक्स का केलं?”
तिसऱ्या व्यक्तीने, बास आता हेच पहायचं बाकी राहिलं होतं? अशी प्रतिक्रिया दिली आहे.
१० सेकंदात अननस कापण्यासाठी पठ्ठ्याने लढवली शक्कल; Video पाहून म्हणाल, “इंटरनेटचे पैसे कामी आले”
नेटकऱ्यांनी केली टिका
अन्न वाया घालवल्याबद्दल अनेकांनी स्ट्रीट फूड विक्रेत्याला सुनावले आहे. ज्यांना हे विचित्र फुड फ्यूजन स्वीकारता आले नाही आणि त्यांनी “तौबा तौबा” असे म्हटले आहे. आणखी एका देसी पदार्थाची वाट लावल्यामुळे निराश होऊ एकाने “छी” अशी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक लोकांनी असेही म्हटले की, या विचित्र फुड फ्युजन निर्मात्याला तुरुंगात टाकले पाहिजे. तुम्हाला काय वाटते?”
चॉकलेट पेस्ट्री वड्याच्या या व्हायरल फूड व्हिडिओ ६३० लाखांपेक्षा जास्तवेळा पाहिला असून, ४ लाखपेक्षा जास्त लाइक्स आणि १७६ पेक्षा जास्त प्रतिक्रिया मिळाल्या आहेत.