यूएस-आधारित टेक कंपनीने रोबोटला त्याचे स्वरूप देण्यासाठी £१,५०,००० (रु. १.५ कोटी) चे बक्षीस जाहीर केले आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, न्यूयॉर्कमधील रोबोट मेकर प्रोमोबोट एका खास प्रोजेक्टवर काम करत आहेत, ज्या अंतर्गत त्यांना आपल्या रोबोटवर मानवी चेहरे लावायचे आहेत.

जाणून घ्या खास योजनेबद्दल

यासाठी कंपनीने एक खास योजना आणली असून कंपनीच्या रोबोटला त्याचे रूप देण्यासाठी दीड कोटी रुपये बक्षीस म्हणून देण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे यासाठी महिला आणि पुरुष दोघेही अर्ज करू शकतात. एकमात्र अट आहे की अर्जदाराचे वय २५ पेक्षा जास्त असावे.माहितीनुसार, लोकांच्या अर्जानंतर ज्याला कंपनी निवडेल त्याच्याशी कंपनी संपर्क साधेल आणि पुढील सर्व औपचारिकता पूर्ण करेल. न्यूयॉर्कस्थित या कंपनीने बनवलेले रोबोट ४३ देशांमध्ये वेगवेगळ्या कामांमध्ये वापरले जात असल्याचे नमूद केले आहे.

( हे ही वाचा:दिल्लीत स्कूटीच्या नंबर प्लेटवरील SEX सीरिजमुळे गदारोळ, तरुणीचं कुटुंब त्रस्त; जाणून घ्या नेमकं काय घडलंय? )

( हे ही वाचा: व्यक्तीने AK47 ने टेस्ला कारवर झाडल्या गोळ्या; पुढे काय झालं बघा व्हायरल व्हिडीओमध्ये )

चेहरा निवडल्यानंतर काय होईल?

पहिल्या टप्प्यात, विजेत्या अर्जदाराला रोबोटच्या बाह्य वैशिष्ट्यांसाठी त्यांच्या चेहऱ्याचे आणि शरीराचे 3D मॉडेल घेणे आवश्यक आहे.

एकदा ते पूर्ण झाल्यानंतर, त्यांना आवाज कॉपी करण्यासाठी ‘किमान १०० तासांच्या भाषण सामग्रीची मटेरियल द्यावं लागेल.

शेवटच्या टप्प्यात, अर्जदाराला ‘परवाना करारावर स्वाक्षरी करावी लागेल’ जो ‘अमर्यादित कालावधीसाठी तुमचा चेहरा वापरण्याची परवानगी देतो’.दुसऱ्या शब्दांत, अर्जदाराला त्याच्या चेहऱ्याचा डिजिटल किंवा प्रिंट वापर अमर्यादित कालावधीसाठी विकावा लागेल.