scorecardresearch

भुकेलेल्या हिप्पोने २ वर्षाच्या बाळाला गिळलं; पण नंतर असं काही घडलं की त्याला पुन्हा जिवंत बाहेर फेकलं

आफ्रिकेतील हिप्पोने २ वर्षाच्या बाळाला गिळले, पण त्यांनंतर असं काही घडल की हिप्पोला या मुलाला तोंडातून बाहेर काढवं लागलं.

भुकेलेल्या हिप्पोने २ वर्षाच्या बाळाला गिळलं; पण नंतर असं काही घडलं की त्याला पुन्हा जिवंत बाहेर फेकलं
photo(indian express)

आफ्रिकेतील युगांडा देशातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका हिप्पोने २ वर्षाच्या मुलाला गिळले. या मुलाला ५ मिनिटे तोंडात ठेवल्यानंतर हिप्पोने त्याला पुन्हा बाहेर फेकले. मात्र यामध्ये आश्चर्याची गोष्ट म्हणजे हे मुलं जिवंत होते. ही घटना सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे.

वास्तविक ही घटना हा मुलगा तलावाच्या काठी खेळताना घडली. द टेलिग्राफच्या वृत्तानुसार, दोन वर्षांचा पॉल इगा एडवर्ड तलावाच्या काठी खेळत होता. तेवढ्यात अचानक पाण्यातून हिप्पो बाहेर आला आणि त्याने त्या मुलाला क्षणार्धात गिळले. हिप्पोने मुलाला भयानक पद्धतीने तोंडात गिळले त्यामुळे या मुलाच्या डोक्याला किरकोळ जखम झाली.

( हे ही वाचा: Video: हाताने रिक्षा चालवली तर पायाने मर्सिडीज; पुण्यातील भन्नाट ड्रायव्हिंगचा व्हिडिओ Viral का होतोय एकदा पाहाच)

व्यक्तीने हिप्पोवर दगडफेक केली

ही घटना घडत असताना तिथे क्रिसपास बगोंजा नावाचा एक व्यक्ती होता. तो पहिल्यांदा तर ही घटना बघून घाबरला मात्र त्यांनतर तो मदतीसाठी पुढे आला. त्याने हिप्पोवर दगडफेक करण्यास सुरुवात केली. ज्यामुळे वैतागलेल्या हिप्पोने गिळलेल्या लहान मुलाला तोंडातून बाहेर फेकले. या घटनेने आजूबाजूच्या परिसरात भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहे. दैव बलवत्तर म्हणून या लहान मुलाचा जीव वाचला.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 16-12-2022 at 19:00 IST

संबंधित बातम्या