Viral : “मी मनापासून भारतीय”, UFC सुपरस्टार कॉनर मॅकग्रेगर भारताच्या प्रेमात; ट्वीटरवर भारतीयांकडून कौतुकाचा वर्षाव!

जरी फायट स्पोर्टची क्रेझ भारतात नुकतीच सुरू झाली असली तरी, मॅकग्रेगर यांनी आधीच देशात एक मजबूत चाहता वर्ग विकसित केला आहे.

UFC superstar Connor McGregor
UFC सुपरस्टार कॉनर मॅकग्रेगर (फोटो:@TheNotoriousMMA / Twitter )

UFC आयकॉन कॉनर मॅकग्रेगर यांनी गुरुवारी त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देताना भारताचे कौतुक केले. भारत आणि देशातील जनतेला आपल्या सणासुदीच्या शुभेच्छा पाठवण्याबरोबरच, मॅकग्रेगरने भारतीय मार्शल आर्टिस्टपैकी एकाचा विशेष उल्लेख केला आहे. कॉनर मॅकग्रेगर काल सलग भारताविषयी आपलं प्रेम व्यक्त करणारे ट्विट केले. त्यांच्या प्रत्येक ट्विटवर त्याच्या भारतीय चाहत्यांनी कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

दिल्या दिवाळीच्या शुभेच्छा!

ट्विटरवर माजी UFC चॅम्पियनने भारतातील सर्व लोकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा दिल्या.

दुसर्‍या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केले की, “भारताने बुद्धिबळाचा शोध लावला. योगाचा शोध लावला. त्यांनी आम्हाला कसे मोजायचे याचाही विचार केला. आइन्स्टाईन म्हणाले की आम्ही भारतीयांचे खूप ऋणी आहोत. भारतात एक सुवर्णमंदिरही आहे जे दररोज १००,००० लोकांना मोफत जेवण देते!”

( हे ही वाचा: याला म्हणतात हर कुत्ते का दिन आता है… सिंह कुत्र्याला घाबरुन पळाला अन् व्हिडीओ व्हायरल झाला )

त्याच वेळी, त्यांनी भारतीय मिश्र मार्शल आर्टिस्ट रितू फोगटचे देखील कौतुक केले.

योग शिकण्यासाठी लवकरच भारतात येणार आहे असही त्यांनी सांगितलं

मॅकग्रेगर यांनी जगातील हिंसाचार बघितलेल्या भारतीय डॉक्टर आणि परिचारिकांच्या निखळ संख्येबद्दल बोलताना देशावरील आपले प्रेम देखील व्यक्त केले.

( हे ही वाचा: व्हाईट हाऊसमध्येही ‘दीपावली’, राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी फोटो पोस्ट करत दिल्या शुभेच्छा!)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

जरी फायट स्पोर्टची क्रेझ भारतात नुकतीच सुरू झाली असली तरी, मॅकग्रेगर यांनी आधीच देशात एक मजबूत चाहता वर्ग विकसित केला आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral i am indian from the heart ufc superstar connor mcgregor in love with india a shower of appreciation from indians on twitter ttg

ताज्या बातम्या