VIRAL VIDEO : वादळात तरंगणारे जहाज तर कुठे अनोख्या माशांनी वेढलेले खलाशी! समुद्रातील अद्भुत क्षण तुम्हाला आश्चर्यचकित करतील !

कधीकधी समुद्र आपल्याला इतकं आश्चर्यचकित करतो की, जर त्याच्याशी संबंधित आश्चर्यकारक गोष्टी कॅमेऱ्यात कैद केल्या नाहीत तर यावर कुणाचाच विश्वास देखील बसणार नाही.

Weird Facts About Sea
(Photo: Facebook/ STUDENTbible)

जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मानवाला चकित करतात. यापैकी एक विशाल महासागर आहे जो आपल्या पृथ्वीचा एक प्रमुख भाग आहे. माणूस या पृथ्वीवर वर्षानुवर्षे जगत आहे, पण त्याची समुद्राविषयीची माहिती अजूनही पूर्ण झालेली नाही. अशा अनेक गोष्टी आहेत ज्यांचे उत्तर आपल्याला माहित नाही. परंतु आपल्याला माहित आहे की, कधीकधी समुद्र आपल्याला इतकं आश्चर्यचकित करतो की, जर त्याच्याशी संबंधित आश्चर्यकारक गोष्टी कॅमेऱ्यात कैद केल्या नाहीत तर यावर कुणाचाच विश्वास देखील बसणार नाही. आज आम्ही तुम्हाला असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत, जो पाहून तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. कारण या व्हिडीओमध्ये समुद्रातील अप्रतिम क्षण दाखवण्यात आले आहेत.

स्टुडंट बायबल नावाच्या फेसबुक पेजने नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे, जो कोणालाही आश्चर्यचकित करेल. हा व्हिडीओ समुद्राशी संबंधित आश्चर्यकारक क्षण दाखवत आहे. लोकांना वाटतं की समुद्र हा मौजमजेसाठी आणि निवांतपणासाठी असतो, पण जेव्हा तुम्ही हा व्हिडीओ पाहाल तेव्हा जाणवेल की समुद्र किती रौंद्र रूप धारण करू शकतो आणि कधी कधी आपल्याला धक्का बसतो.

व्हिडीओतील धक्कादायक दृश्ये
व्हिडीओमध्ये समुद्रातील विविध घटनांशी संबंधित क्लिप आहेत. पहिल्या क्लिपमध्ये एक लहान जहाज भीषण वादळात अडकलेले दिसत आहे. ती कोणत्या ना कोणत्या प्रकारे समुद्राशी लढण्याच्या प्रयत्नात मग्न आहे. दुसरी क्लिप पाहून तुम्हाला असे वाटेल की केवळ छोटी जहाजेच नाही तर मोठी जहाजांची समुद्रात अत्यंत वाईट अवस्था होऊन जाते.

आणखी वाचा : VIRAL VIDEO : लग्न सुरू असताना स्टेजवर प्रियकराची एन्ट्री, नवरदेवासमोरच प्रेयसीच्या भांगेत सिंदूर भरलं आणि….

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : Wedding Gift : काहीही हं! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला जे गिफ्ट दिलं ते पाहून तुम्ही हैराण व्हाल, हा VIRAL VIDEO पाहाच…

या व्हिडीओमध्ये समुद्राच्या जोरदार लाटा उसळताना दिसत आहेत आणि एक मोठे जहाज त्यांचा सामना करताना दिसून येत आहेत. समुद्रातील लाटा इतक्या उंचावर उसळतात की काचेच्या मागे उभं राहून व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडते. तो भयंकर घाबरला होता, असं म्हणताना तुम्ही ऐकू शकता. इतकंच नाही तर व्हिडीओमध्ये पुढे अनेक अप्रतिम दृश्यं आहेत. व्हेलच्या दर्शनाप्रमाणे, अनेक डॉल्फिन समुद्रातून बाहेर पडतात आणि खोलवर पाण्याखाली मजा करतात.

आणखी वाचा : मरणाच्या दारात असलेल्या मांजरींना वाचवण्यासाठी वापरला हा ‘देसी जुगाड’; पाहा हा VIRAL VIDEO

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. आतापर्यंत या व्हिडीओला ६४ मिलियन म्हणजेच ६ कोटींहून अधिक लोकांनी पाहिलं आहे. तर जवळपास ९० हजार लोकांनी या व्हिडीओला लाईक केलं आहे. या व्हिडीओवर हजारो लोकांनी कमेंट केल्या आहेत. बरेच लोक समुद्राशी संबंधित त्यांच्या विचित्र कथा सांगत आहेत आणि अनेक युजर्स व्हिडीओ पाहून आश्चर्यचकित झाले आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral incredible moments at sea weird moments captured in camera viral video prp

ताज्या बातम्या