scorecardresearch

Premium

Shocking Video: खवळलेल्या समुद्रात लाट आली अन् …१० सेकंदात महिलेला घडली आयुष्यभराची अद्दल

Viral video: १० सेकंदात महिलेला घडली आयुष्यभराची अद्दल

Viral Man Saved Life Of A Woman Who Drowned Away With Sea Waves Shocking Video Viral On Social Media
समुद्राच्या लाटांसोबत वाहून गेली महिला

Viral video: पावसाळ्यात तरुण-तरुणी भिजण्यासाठी आणि मजामस्ती करत निसर्गाचा आनंद घेण्यासाठी धबधबे, धरण, नदीवर पोहोचता. काहीजण समुद्र किनारी जातात, बोटींगचा आनंद घेतात. अशावेळी सांगूही पर्यटक एकत नाहीत. काही वेळेला समुद्राला भरती आलेली असते, तरीही पर्यटक नसतं धाडस करतात, आणि हेच धाडस त्यांचा अंगाशी येतं. असाच एक समुद्रातील व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही समुद्रात असं धाडस करताना दहा वेळा विचार कराल.

या व्हिडीओमध्ये पाहू शकता, समुद्र दिसत आहे, समुद्रात मोठ मोठ्या लाटाही उसळताना दिसत आहे. यावेळी काही तरुण समुद्राच्या पाण्यात पोहत आहेत. यावेळी एक महिलाही तिथे दिसत आहे. सुरुवातीला किनाऱ्यावर उभी असलेली महिला हळू हळू पाण्याचा आनंद घेण्यासाठी पाण्यात जाते. मात्र तिचा हाच आनंद जास्त काळ टिकू शकला नाही. पाण्याचा अंदाज न आल्यानं ती खूप पुढे जाते. यावेळी खवळलेल्या लाटांसमोर तिचा टिकाव लागत नाही. आणि ती लाटेसोबत समुद्रात खेचली जाते. ती उठण्याचा प्रयत्न करते तेच पुढच्याच क्षणी प्रचंड मोठी लाट येते आणि तिला आत खेचते.

Mission Raniganj Box Office Collection Day 1
अक्षय कुमारच्या ‘मिशन रानीगंज’ने पहिल्या दिवशी किती कमाई केली? ५५ कोटींचे बजेट असलेल्या सिनेमाने कमावले…
ranbir kapoor
‘अ‍ॅनिमल’साठी रणबीर कपूरने आपल्या फीमध्ये केली मोठी घट? घेतलं ‘एवढं’ मानधन
Hruta tattoo
ऋता दुर्गुळेच्या हातावरील ‘hdp’ टॅटूचा अर्थ काय? अभिनेत्रीनेच सांगितलं होतं गुपित, जाणून घ्या
kitchen tips in marathi how to save gas plastic bottle reuse see shocking result kitchen jugaad video viral
Kitchen Jugaad: झोपण्याआधी गॅसवर ठेवा फक्त २ प्लॅस्टिकच्या बाटल्या; गॅस लवकर संपणारच नाही

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> Fight Video: लालबागच्या राजाच्या मंडपात फ्री स्टाईल हाणामारी; कार्यकर्ते आणि भाविक आपापसांत भिडले

तरुणामुळे वाचले महिलेचे प्राण

दरम्यान किनाऱ्यावर असलेला तरुण हे सगळं पाहतो आणि तिच्या मदतीसाठी धावतो, बऱ्याच प्रयत्नानंतर अखेर महिलेला सुखरुप पाण्याबाहेर काढण्यात येत. त्या तरुणाचं लक्ष गेलं म्हणू महिलेचे प्राण वाचले अन्यथा महिलेचा जीव गेला असता.

हा व्हिडीओ व्हायरल होत असून नेटकऱ्यांनीही यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. अशा प्रकारे पाण्याशी खेळणं, रिस्क घेणं किती महागात पडू शकते हे हा व्हिडीओ पाहून लक्षात येत आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral man saved life of a woman who drowned away with sea waves shocking video viral on social media srk 1

First published on: 22-09-2023 at 16:12 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×