scorecardresearch

रस्त्यावर चालता चालता एकमेकांच्या गळ्यात पडू लागले लोक, कारण जाणून घेण्यासाठी हा VIRAL VIDEO एकदा पाहाच

हा व्हिडीओ इतका सुंदर आहे की, तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा पाहिल्या शिवाय राहू शकणार नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर चालता चालता अचानक एकमेकांच्या गळ्यात पडताना दिसून येत आहेत.

Hug-Here-Viral-Video
(Photo: Instagram/ viralhog)

आपले प्रेम व्यक्त करणे नेहमीच एक सुंदर भावना असते. मात्र, अनेकांना प्रेम व्यक्त करणे जमत नाही. आपल्या मनातलं प्रेम व्यक्त करण्यासाठी एक निमित्त मिळालं की आपण आपोआप त्या निमित्ताने आपल्या आवडत्या व्यक्तींवरचं प्रेम व्यक्त करायला विसरत नाहीत. जगात सगळीकडे एकमेकांमध्ये शत्रुत्व निर्माण करणाऱ्या घटना घडत असताना हा व्हिडीओ लोकांमध्ये प्रेमाची भावना निर्माण करताना दिसून येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडीओ इतका सुंदर आहे की, तुम्ही त्याला पुन्हा पुन्हा पाहिल्या शिवाय राहू शकणार नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये लोक रस्त्यावर चालता चालता अचानक एकमेकांच्या गळ्यात पडताना दिसून येत आहेत. रस्त्यावरून चालता चालता असं नेमकं काय कारण आहे, ज्यामुळे लोक एकमेकांच्या गळ्यात पडत आहेत, असा प्रश्न तुमच्या मनात नक्कीच पडला असेल. त्यासाठी हा व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एका माणसाने अनोख्या पद्धतीने लोकांमध्ये प्रेम शेअर केले आणि त्यांना शिकवले की ज्यांना आपण आवडतो त्यांना एकदा तरी मिठी मारायला हवी. त्यांना कधीही आणि कुठेही मिठी मारावी.

या व्हिडीओमध्ये एका व्यक्तीने त्याच्या घराबाहेरील फुटपाथवर खडूने जमिनीवर एक स्केच बनवलेलं दिसत आहे. ‘हग हिअर’ म्हणजे या ठिकाणी मिठी मारा असा संदेशच रस्त्यावर लिहिलेला दिसत आहे. या ठिकाणाहून रस्त्यावर चालत असताना एक व्यक्ती त्याच्या पत्नीला मिठी मारताना दिसत आहे. पण गंमत म्हणजे त्या ठिकाणाहून जाणारे प्रत्येक जण एकमेकांना मिठी मारताना दिसतात. मित्र, प्रियकर-प्रेयसी तिथं थांबून त्या जागेकडे बघतात आणि मग तिथेच उभे राहून एकमेकांना मिठी मारतात. खरोखर, एकमेकांमध्ये प्रेम शेअर करण्याचा हा मार्ग खूप मजेदार आणि अद्वितीय आहे.

आणखी वाचा : या चिमुकल्याचे सुपर क्यूट एक्सप्रेशन्स पाहून तुमचा दिवस बनून जाईल, VIRAL VIDEO एकदा पाहाच

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : नाद खुळा…शेतकऱ्याने बनवला पेट्रोल-डिझेलशिवाय चालणारा ट्रॅक्टर, मायलेज पाहून व्हाल थक्क

या व्हिडीओला इन्स्टाग्रामवर खूप पसंती दिली जात आहे. या व्हिडीओला आतापर्यंत ७० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी व्हिडीओवर कमेंट करून प्रतिक्रियाही दिल्या आहेत. एका महिलेने लिहिले की ‘प्रेम शेअर करा.’ व्हिडीओमध्ये दिसणार्‍या एका व्यक्तीने मिठी न मारताच प्रेम पसरवण्याचे काम केले, असे एका व्यक्तीने गमतीने सांगितले. एकाने लिहिले की, व्हिडीओमध्ये एकमेकांना मिठी मारताना दिसलेले तीन मित्र हे सर्वात मोहक दृश्य आहे. एकाने लिहिले की ही खूप सुंदर गोष्ट आहे आणि तो त्याच्या घराबाहेरही असेच करेल.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral man writes hug here on street to make people hug each other prp

ताज्या बातम्या