“लखनऊच्या मुलीकडून काही टिप्स” म्हणत ‘त्या’ घटनेचा मीम व्हिडीओ व्हायरल!

घटनेमध्ये मुलीचीच चूक होती असं अनेक नेटीझन्सला वाटतं आणि म्हणूनच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १.२ दशलक्ष लोकांनी बघितलं आहे.

viral video on Girl Seen Assaulting A Cab Driver
लखनऊमध्ये घडलेल्या घटनेच्या आधारे हा व्हिडीओ बनवला आहे. (Photo:@_rexxa/Instagram)

‘लखनऊ मुलीकडून काही टिप्स’ या कॅप्शनसह इन्स्टाग्रामवर पोस्ट झालेला एक व्हिडीओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ रितिक शहा या युट्युबर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरने बनवला आहे. त्याने लखनऊमध्ये घडलेल्या घटनेच्या आधारे हा व्हिडीओ बनवला आहे. यात तो लखनऊच्या प्रियदर्शीनी यादव या मुलीचा अभिनय करताना दिसत आहे. प्रियदर्शीनीने ही घटना घडली त्या दिवशी ज्या पद्धतीने कपडे घातले होते तसेच कपडे घालून रितिकने हा व्हिडीओ बनवला आहे. यात तो सुरुवातीला स्वतःची प्रियदर्शीनी म्हणून ओळख करून देत “मुलगी असण्याचा फायदा घेत बिचाऱ्या कॅब ड्रायव्हरला कसं मारतात हे मी आज शिकवणार आहे.”असं बोलतो.

काय आहे व्हिडीओ?

व्हिडीओच्या सुरुवातीला मारायच्या आधी बॉडी पॉश्चर कसं असलायला हवं ते तो सांगतो.“दहशत पसरवायची आहे, ड्रायव्हरला ३६० डिग्री फिरवून मारायचं आहे. १-२ फटके मारून चालणार नाही तर पूर्ण २० पेक्षा जास्त फटके मारायचे आहेत. हे महत्त्वाच आहे की सगळ्यांना माहितेय तुम्ही मुलगी आहात पण तरी ओरडून सांगायचं आहे तुम्ही मुलगी आहात ते. मग तुमच्यावर गाडी चढलेली असो वा नसो. लोकांना सांगायचं आहे की मुलीवर गाडी चढवणार?” असं बोलत त्याने व्हिडीओ बनवला आहे. यात तो पुढे हे ही सांगतो की पुरुषाच्या पेशन्स सोबत खेळून त्याने तुम्हाला मारण्यासाठी प्रवृत्त करा. आणि त्याने तसं केलं तर तो गेलाच मग तर तुम्ही फेमस झालाच म्हणून समजा. या व्हिडीओमध्ये कोणी दुसऱ भांडण सोडवायला आलं तर त्याला पण मारा असं. सांगत हा व्हिडीओ संपतो.

या व्हिडीओमध्ये त्या मुलीने जे केलं ते कसं चुकीच होत हे मज्जेशीर पद्धतीने सांगण्यात आलं आहे. घटनेमध्ये मुलीचीच चूक होती असं अनेक नेटीझन्सला वाटतं आणि म्हणूनच हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे. आत्तापर्यंत या व्हिडीओला १.२ दशलक्ष लोकांनी बघितलं आहे.

काय होती घटना?

एका तरुणीनं कॅब चालकाला मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ लखनऊ शहरातील अवध क्रॉसिंगजवळचा आहे. त्या व्हिडिओत एक तरुणी भररस्त्यात कॅब चालकाला मारहाण करताना दिसत होती. या चालकानं तिला धडक दिल्याचं ही तरुणी ओरडून सांगत होती. दरम्यान, हा गोंधळ सुरू असताना एक वाहतूक पोलीस तिथं येतो आणि मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो. मात्र, तरीही ती त्या चालकाला मारणं थांबवत नाही. शिवाय त्याचा फोनही तोडून टाकते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Rithik shah (@_rexxa)

ही मुलगी उद्धट आहे, असं अनेकजण म्हणत असल्याचं या व्हिडिओत ऐकू येत होतं.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral meme video on lucknow girl seen assaulting a cab driver and another man ttg

Next Story
…म्हणून हे छायाचित्र इंटनरनेटवर ठरतयं प्रचंड लोकप्रियThis One Photo Sums Up the Difference Between the Generations , viral photo, The internet loves this photo , Loksatta, loksatta news, Marathi, Marathi news
ताज्या बातम्या