कर्नाटकातील ग्रामस्थांचा ‘सूड’ घेण्यासाठी माकडाने केला २२ किलोमीटरचा प्रवास!

गावकऱ्यांकडून ‘सूड’ घेण्यासाठी एका माकडाने बालूर जंगलापासून कर्नाटकच्या चिक्कमगलूर जिल्ह्यातील कोट्टीगेहारा गावापर्यंत २२ किलोमीटरचा प्रवास केला.

Monkey
(फोटो: financial express )

कर्नाटकच्या चिक्कमगलूर जिल्ह्यातील कोट्टीगेहारा गावाच्या शेजारच्या एका माकडाने ग्रामस्थांचा ‘सूड’ घेण्यासाठी २२ किलोमीटरचा प्रवास केला. बोनेट मकाक प्रजातीचा तरुण माकड कोटिगेहारामधील लोकांकडून फळे आणि नाश्ता हिसकावत असे. सुरुवातीला लोकांना माकडाची फारशी पर्वा नव्हती. तथापि, जेव्हा शाळा पुन्हा उघडल्या गेल्या, तेव्हा माकड परिसरातील मोरारजी देसाई शाळेभोवती घिरट्या घालताना दिसले.मुले शाळेच्या आवारात फिरत असताना त्यांना हे माकड दिसले आणि मुले घाबरल्यानंतर कोणीतरी वन विभागाला सतर्क केले. १६ सप्टेंबर रोजी बचाव पथक माकडाला पकडण्यासाठी आले.

वनाधिकाऱ्यांना माकड पकडणे कठीण होते. त्यांनी जवळच्या ऑटो ड्रायव्हर्स आणि इतर लोकांना बोलावून त्यांना एका विशिष्ट दिशेने प्राण्याचा पाठलाग करण्यासाठी मदत करायला बोलावले. एक रिक्षाचालक, जगदीशवर माकडाने हल्ला केला. माकड त्याच्या दिशेने गेला आणि त्याचा हात चावला. जगदीश आपला जीव वाचवण्यासाठी पळून गेला तेव्हा माकड त्याच्या मागे गेला. त्याने आपल्या रिक्षात लपण्याचा निर्णय घेतला पण माकडाने वाहनावर हल्ला केला आणि त्याचे कव्हर फाडले.

“मी खूप घाबरलो होतो. वेडा माकड माझा सगळीकडे पाठलाग करत होता. तो मला इतका जोरात चावले की माझ्या डॉक्टरांनी सांगितले की माझ्या जखमा बरी होण्यास किमान एक महिना लागेल. मी माझी ऑटो-रिक्षा चालवू शकत नाही जी माझी भाजी आणि भाकरी आहे . तसेच, त्या दिवशी माकड माझ्या घरी येईल या भीतीने मी घरी गेलो नाही. माझ्या घरी लहान मुले आहेत. जर त्यांच्यावर हल्ला झाला तर? मी अजूनही खूप घाबरतो, “जगदीशने सांगितले.

३० हून अधिक लोकांचा गट अखेरीस तीन तासांनंतर माकडाला पकडायला यशस्वी झाला. वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी गावापासून सुमारे २२ किलोमीटर दूर असलेल्या बालूर जंगलात माकडाला सोडले. गावकरी त्यांच्या नेहमीच्या दिनक्रमात रमले. तर माकडाने जंगलाजवळील रस्त्याने जात असलेल्या ट्रकमध्ये उडी मारली आणि कसा तरी कोटिगेहारा येथे परत आला.

जेव्हा जगदीशला माकड परत आल्याचे कळले तेव्हा तो घाबरून गेला. “माकड गावात परतले आहे हे ऐकल्यावर मला खूप भीती वाटली. मी स्वतः वनविभागाला फोन केला आणि त्यांना तातडीने येण्यास सांगितले. मुदिगेरे, रेंज फॉरेस्ट ऑफिसर मोहन कुमार बीजी न्यूज १८ शी बोलताना म्हणाले, “माकडाने एका माणसाला का लक्ष्य केले हे आम्हाला खरोखरच माहीत नाही. यापूर्वी त्याने या प्राण्याला काही हानी केली होती किंवा अजून काही केले होते हे आम्हाला माहित नाही. पण , माकडांनी माणसांवर हल्ला करणे हे ऐकले असले तरी माकडाला असे वागताना आपण प्रथमच पाहिले आहे. “

२२ सप्टेंबर रोजी माकड दुसऱ्यांदा पकडले गेले. यावेळी त्याला जंगलाच्या आत सोडण्यात आले. जगदीशला ते माकड पुन्हा परतणार नाही या आशेने घरातच आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Viral monkey travels 22 km to take revenge from villagers in karnataka ttg

ताज्या बातम्या