scorecardresearch

पाळीव कुत्र्याच्या एका चुकीमुळे घर आगीत जळून खाक; मालकीण हेअर ड्रायर बेडवर ठेवून गेली अन्…

कुत्र्याच्या एका उडीमुळे संपुर्ण घर आगीत जळून खाक झाल्याची घटना उघडकीस आली आहे.

पाळीव कुत्र्याच्या एका चुकीमुळे घर आगीत जळून खाक; मालकीण हेअर ड्रायर बेडवर ठेवून गेली अन्…
पाळीव कुत्र्याच्या छोट्याशा चुकीमुळे एक घर जळून खाक झालं आहे. (Photo : Twitter)

कुत्र्याच्या एका उडीमुळे संपुर्ण घर आगीत जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एखाद्या छोट्या चूकीमुळे कधी कधी किती मोठे नुकसान होईल हे सांगता येत नाही असं म्हणतात. नुकतंच एक प्रकरण समोर आले आहे ज्यामध्ये पाळीव कुत्र्याच्या छोट्याशा चुकीमुळे संपुर्ण घर जळून खाक झालं आहे. या आगीचे कारण समजल्यावर तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. शिवाय आपला निष्काळजीपणा किती महागात पडू शकतो याचाही अंदाज येईल.

हेही पाहा- Video: शाळकरी विद्यार्थ्यांसमोरच शिक्षिका एकमेकींशी भिडल्या, मुलं थांबा म्हणत होती आणि त्या केस ओढत राहिल्या

एका हिंदी वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, हे प्रकरण ब्रिटनमधील असून २४ डिसेंबरच्या संध्याकाळी एका घरातून धूर निघू लागल्याचं नागरिकांना दिसलं. त्यानंतर त्यांनी अग्निशामन दलाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दल तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, या घराला आग लागण्याला एका पाळीव कुत्रा कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.

हेही वाच- साताऱ्यातील तरुणाचा कुल्लू-मनालीमध्ये पॅराग्लायडिंग करताना मृत्यू; शेकडो फुटांवरुन पडल्याने जागीच ठार

पाळीव कुत्र्याने चुकून हेअर ड्रायर सुरू केल्यामुळे घराला भीषण आग लागल्याचं सांगिण्यात येत आहे. आग लागलेल्या घराची मालकीण संध्याकाळी घरी परतली असता तिला आपल्या घरातून धूराचे लोट बाहेर येत असल्याचं दिसलं. याचवेळी त्यांचा पाळीव कुत्रा दरवाजाबाहेर बसल्याचंही तिने पाहिलं.

दरम्यान, या घटनेनंतर सांगितलं जात आहे की, महिलेने गडबडीत बेडवर हेअर ड्रायर ठेवला होता तो तसाच ठेवून ती घराबाहेर निघून गेली. मात्र, बेडवर उड्या मारणाऱ्या कुत्र्याकडून तो हेअर ड्रायर चुकून चालू झाल्यामुळे बेडला आग लागली आणि ती आग घरभर पसरली. अग्निशमन दलाला घराला आग लागल्याची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. या घटनेनंतर मॅनेजर गैरी शिन यांनी ब्रिटनच्या लोकांना अशा चुका करू नका किंवा ज्यामुळे मोठे नुकसान होऊ शकते अशा उपकरणांचा वापर करू नका, असं आवाहन केलं आहे. शिवाय आपला आळशीपणा किती घातक ठरु शकतो याचं हे उदाहरण असल्याचं नेटकरी म्हणत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-12-2022 at 15:39 IST

संबंधित बातम्या