नवरीने थेट पोलिसांकडे मेकअप आर्टिस्टविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या नेमकं काय घडलं | Viral News Bride Files Police Complaint against makeup artist know the reason | Loksatta

नवरीने थेट पोलिसांकडे मेकअप आर्टिस्टविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या नेमकं काय घडलं

लग्नातील लूक मुलींसाठी किती महत्वाचा असतो हे सध्या चर्चेत असणाऱ्या एका प्रकरणावरून समजत आहे

नवरीने थेट पोलिसांकडे मेकअप आर्टिस्टविरुद्ध दाखल केली तक्रार; जाणून घ्या नेमकं काय घडलं
मेकअप आर्ट्रिस्ट विरोधात तक्रार दाखल केलेल्या या प्रकरणात काय घडलं जाणून घ्या (फोटो: Freepik)

सध्या सर्वत्र लगीन सराई सुरू आहे. लग्नात घडणाऱ्या गमतीजमती यांची एक वेगळीच मजा असते. प्री वेडिंग फोटोशूटपासून, लग्नातील भन्नाट डान्स असे अनेक व्हिडीओ, फोटो सध्या व्हायरल होत आहेत. या सगळ्यांमध्ये सध्या एक वेगळ्याच बातमीने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. या बातमीमधील आश्चर्याची बाब म्हणजे एका नवरीने मेकअप आर्टिस्ट विरोधात चक्क पोलीसांकडे तक्रार दाखल केली आहे. नेमकं काय घडलं जाणून घ्या.

मध्यप्रदेशमधील एका महिलेने लग्नादिवशी तिचा मेकअप बिघडवल्यामुळे मेकअप आर्टिस्ट विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. मेकअप चुकीच्या पद्धतीने केल्याचा दावा या महिलेने केला. जेव्हा नातेवाईकांनी याबाबत ब्युटी पार्लरच्या मालकाकडे याबाबत तक्रार केली, तेव्हा उलट त्यांनाच धमकवण्यात आले.

आणखी वाचा: कुत्र्याला जेवू घालण्यासाठी नवरीने चक्क…; नेटकऱ्यांची मनं जिंकणारा Viral Video पाहिलात का?

कोटवाली पोलिसांनी या ब्युटी पार्लर विरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांना मेकअपची ऑर्डर दिली होती त्या आर्टिस्ट न येता, त्यांनी इतर कोणाला मेकअप करण्यासाठी पाठवले ज्यामुळे हा गोंधळ झाला. या उदाहरणावरून लग्नासारख्या महत्त्वच्या दिवशीचा लूक मुलींसाठी किती महत्वाचा असतो हे स्पष्ट होते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 08-12-2022 at 18:05 IST
Next Story
आता फुटबॉलची किक नाही, तर…; स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तीयानो रोनाल्डोचा ‘तो’ Video होतोय Viral