कचरा ही आपल्या देशातील सर्वात मोठी समस्या आहे. दिवसेंदिवस वाढणाऱ्या कचऱ्यामुळे प्रदुषणामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होतं आहे. प्रदुषण वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्यांमध्ये वाढ होत आहे. दिल्लीसारख्या शहरांमध्ये तर वाढत्या प्रदुषणामुळे लोकांना मोकळा श्वास घेणं देखील कठीण झालं आहे. प्रदुषणाचा हाच धोका ओळखूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियानाची सुरुवात केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कारण, सर्वसामान्य नागरिकांचा सहभाग वाढेल तेव्हाच स्वच्छता राखली येईल. लोकांचा सहभाग वाढवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनजागृतीसाठी स्वच्छ भारत अभियानाची सुरूवात केली. मात्र, आपला परिसर स्वच्छ रहावा म्हणून उदयपूरमधील केलवाडा येथील एका चहाची टपरी चालवणाऱ्या युवकाने अनोखी शक्कल लढवली असून, तो प्लास्टिकच्या बॉटल आणि कचऱ्याच्या बदल्यात लोकांना मोफत चहाचं वाटप करत आहे. त्यामुळे लोक आपल्या परिसरातील कचरा गोळा करुन त्याच्या टपरीवर जमा करताना दिसतं आहेत.

हेही पाहा- आळशीपणाचा कळस! Online Payment साठी सतत मोबाईल काढावा लागतो म्हणून पठ्ठ्याने हातावरच काढला बारकोड

हा अनोखा उपक्रम सुरु केलेल्या युवकाचं नाव भग्गासिंग आहे. त्याने त्याच्या चहाच्या टपरीसमोर एक बोर्ड लावला आहे. त्यावर लिहलं आहे की, ‘प्लास्टिकचा कचरा आणा आणि मोफत चहा-कॉफी, नाश्ता मिळवा’ त्यामुळे केवळ प्लास्टिकच्या बॉटल आणि कचऱ्याच्या बदल्यात कोणतेही शुल्क न घेता फक्त कचऱ्याच्या बदल्यात चहा देणाऱ्या युवकाचं सर्व स्तरातून कौतुक करण्यात येतं आहे.

दरम्यान, या युवकाच्या चहाच्या टपरीची भुरळ भारतीय क्रिकेटर रवी बिष्णोई याला देखील पडली आणि त्याने प्लास्टीकची बॉटल देऊन भग्गासिंगच्या टपरीवर चहा पिल्याचंही व्हीडिओमध्ये दिसतं हे. शिवाय भग्गासिंगच्या चहाच्या टपरीची चर्चा सोशल मीडियावर जोरदार सुरु आहे. शिवाय आपला परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी त्याच्या प्रामाणिक प्रयत्नाचं कौतुक केलं जातं आहे. तर भग्गासिंगच्या अनोख्या उपक्रमाचे ग्रामीण स्वच्छ भारत उपक्रमाच्या सोशल मीडियावर दखल घेतली असून त्यांनी देखील त्याच्या या उपक्रमाचं कौतुक केलं आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral news donate plastic waste and drink free tea udaipur youths initiative for cleanliness jap
First published on: 03-12-2022 at 12:16 IST