scorecardresearch

बापरे! जन्माला आली चक्क शेपटी असलेली मुलगी, ५.७ सेंटीमीटरची शेपटी पाहून पालकांसह डॉक्टरही चक्रावले

शेपटीची लांबी सुमारे २ इंच म्हणजेच ५.७ सेंटीमीटर असून ती ३ ते ५ मिमी. जाड असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं

बापरे! जन्माला आली चक्क शेपटी असलेली मुलगी, ५.७ सेंटीमीटरची शेपटी पाहून पालकांसह डॉक्टरही चक्रावले
जन्माला आली चक्क शेपटी असलेली मुलगी (Photo : Indian Exppress)

मेक्सिकोमधून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे नुकत्याच जन्माला आलेल्या एका मुलीला शेपटी असल्याची माहिती समोर आली आहे. मुलीला शेपटी असल्याचं पाहून डॉक्टर आणि मुलीच्या पालकांनादेखील आश्चर्याचा धक्का बसला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मेक्सिकोतील न्युवो लिओन येथील एका रुग्णालयात ऑपरेशनद्वारे या मुलीचा जन्म झाला. या मुलीला जन्मताच शेपटी असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. तर या शेपटीची लांबी सुमारे २ इंच म्हणजेच ५.७ सेंटीमीटर असून ती ३ ते ५ मिमी. जाड असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. शिवाय ही शेपटी मऊ असून तिच्यावर केस असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.

हेही वाचा- उंदीर मारण्याच्या गुन्ह्यात तरुणाला अटक, पोलिसांनी उंदराचं पोस्टमार्टम केलं अन्…

घाबरण्याचे कारणं नाही –

दरम्यान, मुलीला शेपटी असल्यामुळे पालकांमध्ये थोडं भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, वैद्यकीय तपासणीमध्ये मुलीचे इतर सर्व अहवाल सर्वसामान्य मुलांप्रमाणे असून तीला कोणत्याही प्रकारचा त्रास नसल्याचं डॉक्टरांनी सागिंतलं.

ऑपरेशनाद्वारे काढली शेपटी –

हेही पाहा- Video: हवेतून उडणारं विमान थेट विजेच्या तारांमध्ये घुसलं, ९० हजार घरात…

दरम्यान, या चिमुकलीची शेपटी तिच्या जन्मानंतर दोन महिन्यांनी ऑपरेशनाद्वारे काढण्यात आली आहे. ऑपरेशान करण्याआधी मुलीच्या सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर मुलीचे वजन ऑपरेशन करण्यायोग्य झाल्यानंतरच तिचे ऑपरेशन करण्यात आले. डॉक्टरांनी मुलीचे एमआरआय (MRI) स्कॅनसह इतर अनेक चाचण्या केल्या. त्या चाचण्यांच्या अहवालानुसार तिला अन्य कोणत्याही प्रकारची वैद्यकीय समस्या नाही. शिवाय या मुलीच्या आधीही तिच्या आईला एक मुलगा असून तो देखील पूर्णपणे निरोगी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे.

हेही वाचा- पोट की पैशांचा खजिना? रुग्णाच्या पोटातून डॉक्टरांनी काढली तब्बल १८७ नाणी

याआधीही शेपटी असलेल्या मुलांचा जन्म –

याआधी देखील शेपटी असलेल्या मुलांचा जन्म झाला होता. एका अहवालानुसार २०१७ पर्यंत पर्यंत जवळपास १९५ शेपटी असलेल्या मुलांच्या जन्माच्या नोंदी आहेत. तर २०२१ ला ब्राझीलमध्ये शेपटी असलेल्या मुलाचा जन्म झाला होता.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 17:05 IST

संबंधित बातम्या