Viral Post Son’s Emotional Message : जसजसं वय वाढत जाते तसतसं मुलांना पालकांचे आई-बाबा व्हावे लागते. पण, मित्र-मैत्रिणींची विचारपूस करणारे अनेकदा आई-बाबांची विचारपूस करायला थोडे डगमगता. मनात काळजी असली तरीही ती आई-बाबांना दाखवायची कशी अशा गोंधळात असतात. पण, आता सोशल मीडियाचे युग असल्यामुळे आपल्या भावना मेसेजवरही सांगता येतात. तर आज सोशल मीडियावर असेच काहीतरी बघायला मिळाले. आईने तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी लेकाने अगदी कठोर आणि प्रेमळ शब्दात तिला मेसेज केला आहे.
रेडिटवरील एका तरुणाने भावनिक पोस्ट शेअर केल्याने सोशल मीडिया युजर्स भारावून गेले आहेत. त्याने त्याच्या आईला आरोग्याला प्राधान्य देण्याबद्दल मोकळेपणाने मेसेजवर सांगितले. तर गोष्ट अशी की, @r/TwentiesIndia या युजरच्या आईला संधिवात आणि सांधेदुखीचा त्रास होता. पण, कामावरून थकून आल्यामुळे आई नेहमी व्यायाम करणे आणि बाहेर जाणे सुद्धा टाळायची. युजरच्या एका मित्राच्या वडिलांना अर्धांगवायू झाला होता. त्यामुळे पन्नाशीनंतर असे आजार उद्भवल्यानंतर नेमके काय करावे याबद्दल त्याने मित्राशी खोलवर चर्चा केली.
त्याने पोस्ट शेअर करत लिहिले की, तुमच्या पालकांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास सांगा. हे खूप महत्वाचे आहे. रेडीत युजर सध्या आईबरोबर राहत नाही. कारण – तो एमबीए करतो आहे आणि पुढच्या वर्षापासून तो नोकरी करण्यासही सुरुवात करणार आहे. त्यामुळे यादरम्यान युजरला एक गोष्ट जाणवली आहे की, आपलं करिअर आणि प्रगतीच्या संधी कुटुंबाच्या आणि प्रियजनांच्या आरोग्याशी थेट जोडलेल्या असतात. म्हणजेच जर तुमचे जवळचे लोक निरोगी असतील, तर तुम्हीही निर्धास्तपणे काम करू शकता आणि पुढे जाऊ शकता” .
पोस्ट नक्की बघा…

त्यामुळे त्याने आईला मेसेज करण्याचे ठरवले. आईला पाठवलेल्या काळजी घेणाऱ्या संदेशांचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला; ज्यामध्ये त्याने लिहिले होते उशीर होण्यापूर्वी स्वतःची काळजी घे, थकलेली अशील तरीही काहीतरी हालचाल कर, चांगले अन्न खा, व्यायाम करण्यावर जास्त लक्ष केंद्रित कर, तुझं मन, इच्छा नसेल तरी बाहेर जा. जर तू आता तुझ्या आरोग्यावर लक्ष केंद्रित केलेस तर मी माझ्या करिअरवर लक्ष केंद्रित करू शकेन. म्हणून, इतर सगळ्यांकडे लक्ष देण्यापेक्षा आरोग्याकडे जास्त लक्ष दे”.
सोशल मीडियावर ही पोस्ट r/TwentiesIndia रेडीटवरून @Filmyboy7 या अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. युजर्स सुद्धा पोस्ट पाहून त्यांच्या वृद्ध पालक आरोग्याकडे कसे दुर्लक्ष करतात याबद्दल चिंता व्यक्त करत आहेत”, “मी माझ्या गावी जाताना दरवेळी असेच करतो – मी माझ्या पालकांना बसवून त्यांना संपूर्ण आरोग्याबद्दल व्याख्यान देतो” “तूझे मेसेज अजिबात कठोर नव्हते वाटतं, मला खात्री आहे की काकू तुझे ऐकतील”, “कधी कधी पालकांशी बोलताना कठोर भूमिका आवश्यक आहे आणि पालकांनी स्वतःच्या आरोग्यासाठी त्यांच्या मुलांच्या सल्ल्याचे पालन करावे हे त्यांचे कर्तव्य आहे” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकरी कररताना दिसत आहेत.
