एका अमेरिकन महिलेने विमानात पाळीव मांजरीला स्तनपान करण्यास सुरूवात केल्याचं पाहून प्रवासी हैराण झाले. आश्चर्यचकीत झालेल्या विमानातील प्रवाशांनी विमान स्टाफकडे तक्रार केली. मात्र महिलेनं कुणाचंही ऐकलं नाही. या प्रकरणी आता तपास करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. डेल्टा एअरलाइन्समध्ये महिला प्रवास करत होती. हे विमान न्यूयॉर्कवरून अटलांटाला जात होतं. मात्र प्रवासादरम्यान महिला मांजरीला स्तनपान करू लागली. यावर आसपास बसलेल्या प्रवाशांनी आक्षेप घेतला. पण त्या महिलेनं कुणाचंही ऐकलं नाही. त्यानंतर प्रवाशांनी विमान स्टाफकडे याबाबतची तक्रार केली.

“सीट क्रमांक १३ ए येथे बसलेली महिला आपल्या मांजरीला स्तनपान करत आहे. विमान स्टाफने मनाई करूनहीी ती ऐकत नाही.”, अशी सूचना दिलेला मॅसेज ट्वीटरवर शेअर करण्यात आला. त्यानंतर बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी व्हायरल झाली. हा मॅसेज एसीएआरएस प्रणालीवर पाठवण्यात आला आहे. ही एक टेक्स्ट मॅसेजिंग सेवा असून याचा वापर विमानाने उड्डाण घेतल्यानंतर एअरलाइन्सद्वारे पायलटशी संवाद साधण्यासाठी केला जातो.

Viral: पाच लाख खर्च करून तरुणीने ओठ केले मोठे; आता आणखी…

डेल्टा एअरलाइन्समध्ये पाळीव जनावरांना घेऊन जाण्याची परवानगी आहे. महिला विमानात एका मांजरीसह आली होती. तिने मांजरीला एका लहान मुलासारखं चादरीत गुंडाळून बसली होती. नियमानुसार मांजरीला सीटखाली कॅरिअरमध्ये ठेवण्याचा नियम आहे. विमान प्रशासन याबाबत चौकशी करत आहे.