scorecardresearch

VIRAL VIDEO : तळपत्या उन्हात राबणाऱ्या आईसाठी लेकीची माया पाहून हृदय पिळवटून जाईल

आईची आई होणं ही मायाच जणू लेकींमध्ये दडलेली असते. अशाच आईची आई बनलेल्या एका लेकीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

Mother-Daughter-Video-Viral
(Photo: Instagram/ bhutni_ke_memes)

आपल्या चुकांवर पांघरून घालणारी, आपल्याला उभं राहण्यासाठी बळ देणाऱ्या आईची तुलना कोणासोबतही होऊ शकत नाही. जगातील सर्वात बलाढ्य योद्धा असते. आई आपल्या मुलांसाठी कोणत्याही संकटाला तोंड देऊ शकते. वेळप्रसंगी ती आपला जीव देऊन आपला मुलांचा जीव वाचवते. आई जेव्हा संघर्ष करून थकते तेव्हा लेकी त्यांच्या आई बनून त्यांचा आधार बनतात. आईची आई होणं ही मायाच जणू लेकींमध्ये दडलेली असते. अशाच आईची आई बनलेल्या एका लेकीचा व्हिडीओ व्हायरल होतोय. हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक व्हाल, हे मात्र नक्की.

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रखरखत्या उन्हात एक महिला रस्त्याच्या कडेला फळे विकताना दिसत आहे. यादरम्यान महिलेची लेक सुद्धा तिच्या मागे उभी असल्याचे दिसले. कडक उन्हात काबाडकष्ट करणारी आई उन्हामुळे घामाने भिजून गेली होती. तळपत्या उन्हाचा देखील या आईने विचार केला नाही आणि पोटापाण्यासाठी ती उन्हात सुद्धा फळे विकत राहिली. आईची घामाने भिजलेली पाहून मुलीला धीर सुटला नाही. या निरागस लेकीने लगेच एक प्लास्टिकचा ट्रे घेतला आणि आपल्या आईला वारा घालू लागली. ती आई आपल्या कामात इतकी गुंतली होती की मागे आपली लेक आपल्यासाठी वारा घालतेय हे सुद्धा तिच्या लक्षात आलं नाही. पण तरी सुद्धा ही लेक आपल्या आईला वारा घालत राहिली.

आणखी वाचा : VIRAL: महिलेला साप चावल्यानंतर पतीने त्याला बाटलीत टाकून हॉस्पिटल गाठलं

इथे पाहा हा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : बूट घालून शिवलिंगावर बिअरचा अभिषेक करतानाचा VIDEO VIRAL, हिंदू समाजाची पोलिसांत तक्रार

हा माय लेकीचा व्हिडीओ bhutni_ke_memes नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करण्यात आला आहे, जो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्ही भावूक तर व्हालच पण काही वेळाने तुमच्या चेहऱ्यावर एक गोड स्माईल देखील आल्याशिवाय राहणार नाही. माय-लेकीच्या आयुष्यातला हा क्षण लोकांना खूपच आवडू लागलाय. हा व्हिडीओ इतका व्हायरल झालाय की आतापर्यंत या व्हिडीओला १० हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.

लोक या व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका लिहिले आहे की, ‘कारण ही आई आहे’. तर तिकडे दुसऱ्या युजरने लिहिले की, या चिमुरडीने तिच्या आईसाठी जे काही केले, मी तिला सलाम करतो. याशिवाय बहुतांश यूजर्स हार्ट इमोजी शेअर आपल्या भावना व्यक्त करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Viral news today maa beti emotional video daughter heart melted after seeing mother hard work in hot weather prp

ताज्या बातम्या