Farmer Viral Video: देसी जुगाडच्या बाबतीत भारतीयांचा हात कोणीही पकडू शकत नाही. यात हल्ली शेतीच्या कामातही अनेक प्रकारचे जुगाड वापरले जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचा वेळही वाचतोय आणि पैशांची देखील बचत होतेय. शिवाय शेतीच कामही योग्य पद्धतीने होत असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होताना दिसतात. सध्या असाच एक व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं प्रेक्षकांचीही मनं जिंकून घेतली आहे. शेतात शेतकरी किती राबत असतो याची आपल्यालाही कदाचित जाणीवही नसेल. सध्या शेतकऱ्यांच्या सक्षमीकरण करणाऱ्याकडेही केंद्र आणि राज्य सरकारचा भर आहे. आपला देश हा शेतीप्रधान आहे. त्यामुळे आपल्याकडे शेतीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. परंतु सध्या असाच एक शेतात व्हिडीओ हा सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत शेतकऱ्याचा जूगाड पाहून नेटकऱ्यांनी त्याचे अपार कौतुक केले आहे.
आपले कष्ट वाचविण्यासाठी शेतकऱ्यानं केलेली ही ट्रीक नेटकऱ्यांच्या चांगलीच पसंती उतरली आहे. परंतु नक्की या शेतकऱ्यांनं केलं काय? अशा नक्की कोणत्या पिकांवर त्यानं हा जुगाडाचा प्रयोग केला? आणि त्यानं हे कसं काय केलं? असे प्रश्न तुम्हालाही पडलाच असेल तेव्हा हा लेख जाणून घेऊन तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर नक्की मिळेल. तेव्हा तुम्हीही हा व्हिडीओ पाहिला नसेल तर नक्की पाहा. तुम्हालाही कदाचित या व्हिडीओतून प्रेरणा मिळेल. सध्या हा व्हिडीओ सगळीकडेच व्हायरल होतो आहे.
शेतकऱ्यानं असा जुगाड केलाय की, यामुळे कांद्याचा जोश उतरतो आणि पुर्ण रस कांद्यात उतरतो. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, शेतकऱ्यानं शेतात कांदे लावले आहेत यावेळी कांद्याचं पिक व्यवस्थित यावं यासाठी ते कांद्याची रोपं खाली झोपवत आहेत. एक मोठा बांबू घेऊन हा जुगाड केला जातोय. ज्यासाठी पुष्कळ वेळ खर्च करावा लागतो. आता आपले हे कष्ट दूर करण्यासाठी शेतकऱ्यानं अनोखा जुगाड केला आहे. असा जुगाड केल्यानं कांद्याचं पिक चांगलं येतं असा दावा या शेकऱ्यानं केला आहे.
पाहा व्हिडीओ
हेही वाचा >> “एकदा वय निघून गेलं की हा आनंद नाही” हलगीच्या तालावर मित्रांनी धरला ठेका; VIDEO पाहून म्हणाल नादच खुळा…
अशी आयडिया केल्यानं या शेतकऱ्याचे काम सोप्पे झाले आहे. तो भुसा थेट ट्रकमध्ये जमा होतो आहे. तुम्हीही हा व्हिडीओ जरूर पाहा. हा व्हिडीओ agricos_aadisayande या यूझरनं इन्टाग्रामवर शेअर केला आहे.