Optical Illusion Hidden Dog Puzzle: इंटरनेटवर दररोज हजारो फोटो व्हायरल होत असतात. काही फोटो हसवतात, काही विचार करायला भाग पाडतात, तर काही असे असतात की, ते आपल्या डोळ्यांनाच आव्हान देतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक गूढ फोटो प्रचंड चर्चेत आला आहे. पहिल्या नजरेत हा फोटो अगदी साधासुधा वाटतो. पहिल्या नजरेत हा फोटो अगदी साधासुधा त्यामध्ये बर्फात उभे असलेले दोन कुत्रे आणि त्यांच्यासोबत काळ्या कपड्यांतील एक व्यक्ती दिसते. पण, जसजसे लोक तो फोटो बारकाईने पाहू लागले, तसतशी त्यांची अवस्था अक्षरश: डोक्याला शॉर्टसर्किट झाल्यासारखी झाली.

‘या’ फोटोमध्ये जे दिसतंय, ते खरंच तसं आहे?

हा फोटो प्रसिद्ध ‘Massimo’ अकाउंटवरून शेअर करण्यात आला आणि काही क्षणांतच लाखो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. “फोटोमध्ये दोन कुत्रे आणि एक माणूस दिसतोय… मग तिसरा कुत्रा कुठे आहे” असा प्रश्न लोकांना विचारण्यात आला. अनेकांनी फोटो झूम करून पाहिला. काहींनी स्क्रीन ब्राईटनेस वाढवला. काहींनी तो फोटो मित्रांना पाठवून उत्तर मागितलं; पण तरीही बहुतेक लोकांना तिसरा ‘कुत्रा’ काही सापडला नाही. याच कारणामुळे हा फोटो आता इंटरनेटवरील सर्वांत भन्नाट ऑप्टिकल इल्यूजन (दृष्टिभ्रम)पैकी एक मानला जात आहे.

ऑप्टिकल इल्यूजन म्हणजे डोळ्यांनी दिसलेलं आणि मेंदूला समजलेलं वास्तव यांमध्ये झालेला गोंधळ. आपण जे पाहतो, ते मेंदू तसं समजून घेतोच, असं नाही. अनेक वेळा आपला मेंदू अपूर्ण माहिती पूर्ण करून स्वतःचं चित्र तयार करतो. त्यामुळे प्रत्यक्षात काहीतरी वेगळंच असताना आपल्याला पूर्णपणे दुसरंच दिसत राहतं.

येथे पाहा फोटो

या फोटोमध्येही नेमकं तसंच घडलं आहे.

पहिल्यांदा फोटो पाहताना बहुतेक लोकांना बर्फात उभा असलेला एक माणूस दिसतो. त्या व्यक्तीनं काळे कपडे घातलेले आहेत, गळ्यात फरसारखा स्कार्फ आणि डोक्यावर मोठी केसाळ टोपी आहे, असं वाटतं. त्याच्या बाजूला दोन कुत्रे उभे आहेत, हे स्पष्ट दिसतं; पण खरी गंमत इथेच सुरू होते.

लोक जितक्या वेळा फोटो पाहतात, तितका त्यांचा गोंधळ अधिक वाढत जातो. “तिसरा कुत्रा कुठे आहे,” हा प्रश्न मेंदूला सतत छळत राहतो. काहींना बर्फात एखादी सावली दिसते. काहींना मागे कुठेतरी चेहरा दिसल्यासारखा वाटतो. काही लोकांनी तर “हा फोटो एडिट केलेला आहे,” असाही दावा केला.

काहींना बर्फात एखादी सावली दिसते. काहींना मागे कुठेतरी चेहरा दिसल्यासारखा वाटतो. काही लोकांनी तर “हा फोटो एडिट केलेला आहे,” असाही दावा केला.

सत्य अधिक धक्कादायक!

विशेष म्हणजे या फोटोमध्ये कुठलाही माणूस नाही. होय… ज्या व्यक्तीला सगळे जण माणूस समजत होते, ते प्रत्यक्षात वेगळंच काहीतरी आहे. आपल्या मेंदूनं काळ्या रंगाची आकृती, तिचा आकार आणि त्यावरील फरसारखे (प्राण्याच्या अंगावरील दाट, मऊ केसांसारखा दिसणारा भाग) दिसणारे भाग एकत्र करून. त्याला ‘माणूस’ मानलं; पण वास्तव पूर्णपणे वेगळं निघालं.

फोटोचा खुलासा झाल्यानंतर अनेक जण अक्षरशः अवाक् झाले. कारण- जो ‘स्कार्फ’ वाटत होता, तो प्रत्यक्षात त्या प्राण्याचा चेहरा होता आणि जी ‘फरची टोपी’ वाटत होती, ती त्याची शेपटी निघाली!

होय… फोटोमध्ये दिसणारा तो तथाकथित ‘माणूस’ म्हणजेच तिसरा कुत्रा आहे – एक काळा पूडल!

एक काळा पूडल म्हणजे Poodle नावाच्या जातीचा काळ्या रंगाचा कुत्रा. पूडल ही कुत्र्याची एक प्रसिद्ध जात आहे, ज्यांचे केस कुरळे आणि दाट असतात.

येथे पाहा उत्तर

एकदा हे सत्य समजलं की, फोटो पुन्हा पाहताना लगेच तिसरा कुत्रा स्पष्ट दिसू लागतो; पण तोपर्यंत आपला मेंदू आपल्याला वेगळंच चित्र दाखवत राहतो. म्हणूनच हा फोटो सध्या इंटरनेटवर लोकांच्या डोळ्यांची आणि मेंदूची खरी परीक्षा घेत आहे.