Optical Illusion Viral Photo: सोशल मीडियावर वन्यजीव दर्शवनारे विविध प्रकारचे फोटो व्हायरल होत असतात. सहसा, हे फोटो लोकांना प्रभावित करतात आणि कधीकधी आश्चर्यचकितही करतात. तथापि, काहीवेळा, असे काही फोटो व्हायरल होतात ज्यातले वन्यजीव शोधण एक आव्हान असत. अशा फोटोना अधिक पसंती दिली जाते. असाच एक फोटो व्हायरल झाला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुम्हाला बिबट्या दिसतोय का बघा

ऑप्टिकल इल्युजनच्या या नवीन फोटोने सोशल मीडिया युजर्सला चांगलच कामाला लावलं आहे. मोकळ्या मैदानात एक प्राणी बसलेला असतो, पण त्याला कोणीही सहज पाहू शकत नाही. बघा तुम्हाला पहिल्या नजरेत सपडतोय का बिबट्या. फोटोत बिबट्या कुठेतरी बसला आहे, पण तो सहजासहजी दिसत नाही. एक फोटोग्राफर खडकाळ डोंगराच्या मधोमध फोटो क्लिक करत होता, पण त्याने फोटो क्लिक करून कॅमेरा झूम केला तेव्हा त्याला एक बिबट्या बसलेला दिसला. हाच बिबट्या तुम्हाला दिसतोय का बघा.

(हे ही वाचा: Viral Photo: तुम्ही ‘या’ फोटोतला टोळ शोधू शकता का?)

‘इथे’ आहे बिबट्या

आता हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. लोक तासनतास या फोटोकडे बघून टक लावून उत्तर शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. तुम्हाला बिबट्या सापडला नसेल तर आम्ही तुम्हाला मदत करू. खाली दिलेला फोटो नीट बघा आणि उत्तर जाणून घ्या.

(हे ही वाचा: Viral Photo: व्हायरल झालेल्या ‘या’ फोटोतला दुसरा बिबट्या तुम्ही शोधू शकता का?)

दगड आणि गवताच्या मध्ये बसलेला बिबट्या कोणालाही सहज सापडणार नाही. ३४ वर्षीय फोटोग्राफर अभिनव गर्गने यांनी हा फोटो क्लिक केला आहे. जयपूरमधील अरवली पर्वतांमध्ये तासनतास प्रतीक्षा केल्यानंतर हे छायाचित्र क्लिक करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Viral photo can you find the leopard in this photo try it out ttg
First published on: 07-06-2022 at 11:40 IST