Viral Photo Modi meet Cockroach Janta Party founder : लाईटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असलेले एक फोटो आढळला. या फोटोद्वारे असा दावा करण्यात आला होता की, त्यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ‘कॉक्रोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दिपके दिसत आहेत. परंतु, तपासादरम्यान आम्हाला असे आढळून आले की, व्हायरल झालेले हा फोटो एआय-निर्मित (AI-generated) आहे. प्रत्यक्षात पीएम मोदी आणि अभिजीत दिपके यांच्यात अशी कोणतीही भेट झाली झाली नव्हती.
काय होत आहे व्हायरल?
एक्स (ट्विटर) युजर @ShravanGarg यांनी हा व्हायरल फोटो खोट्या दाव्यासह शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील हाच फोटो अशाच प्रकारच्या दाव्यासह शेअर करीत आहेत.
तपास…
आम्ही व्हायरल फोटो रिव्हर्स इमेज सर्च करून तपासाला सुरुवात केली; मात्र कोणत्याही विश्वासार्ह वेबसाईटवर हा फोटो आम्हाला आढळला नाही.
महाराष्ट्रातील शिवसेना (UBT) नेते संजय राऊत यांनी हा फोटो त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला, जो त्यांनी नंतर डिलीट (रद्द) केला.
https://www.mid-day.com/amp/mumbai/mumbai-news/article/shiv-sena-ubt-mp-sanjay-raut-shares-a-picture-of-pm-modi-shaking-hands-with-cjp-founder-dipke-23634680
त्यांनी एका पत्रकार परिषदेत असा आरोपही केला गेला होता की, पीएम मोदी आणि अभिजीत दिपके यांची यापूर्वी अमेरिकेत भेट झाली होती.
मात्र, हे केवळ आरोप होते आणि या दाव्यांचे समर्थन करणारा कोणताही फोटो उपलब्ध नव्हता.
त्यानंतर आम्ही हा फोटो एका एआय इमेज डिटेक्टर (AI image detector)मधून तपासला.
आम्ही हा फोटो HIVE च्या AI कंटेंट डिटेक्टरद्वारे तपासला, ज्याने हा फोटो एआय-निर्मित असल्याचे सांगितले.

आम्ही Sightengine आणि ZeroGPT च्या AI इमेज डिटेक्टर्सद्वारेदेखील या फोटोची पडताळणी केली आणि तो फोटो एआय-निर्मित (AI-generated) असल्याचेच समोर आले.

निष्कर्ष
अभिजीत दिपके यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली नव्हती. व्हायरल झालेला हा फोटो एआय-निर्मित असून, खोट्या दाव्यांसह शेअर केला जात आहे
