narendra modi and BRICS leaders group selfie goes viral : भारताच्या अध्यक्षतेखाली १२ व १३ सप्टेंबर रोजी नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स शिखर परिषद आयोजित करण्यात आली आहे. यादरम्यान लाईटहाऊस जर्नालिझमच्या (Lighthouse Journalism) निदर्शनास आले की, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक फोटो मोठ्या प्रमाणावर शेअर केले जात आहे. हा फोटो ब्रिक्स (BRICS) नेत्यांचा ग्रुप सेल्फी असल्याचा दावा केला जात होता.

विकसनशील देशांसाठी जागतिक अजेंडा ठरविण्यात या गटाची महत्त्वाची भूमिका राहणार आहे. दरम्यान, व्यापार, गुंतवणूक आणि जागतिक संघर्षासारख्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी ब्रिक्स देशांचे नेते शनिवारी नवी दिल्ली येथे शिखर परिषदेसाठी एकत्र आले होते.

तेव्हापासून रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, ब्राझीलचे अध्यक्ष लुइझ इनासिओ लुला दा सिल्वा, संयुक्त अरब अमिरातीचे (UAE) अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नाह्यान, भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, तुर्कस्तानचे अध्यक्ष रेसेप तय्यप एर्दोगान, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामफोसा व इराणचे इब्राहिम रायसी यांना एक सेल्फी सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पण, आमच्या तपासादरम्यान असे दिसून आले की, हा फोटो एआय-जनरेटेड आहे.

नवी दिल्लीत १८ वी ब्रिक्स परिषद सुरू असताना हा फोटो समोर आला, ज्यामुळे तो सोशल मीडिया युजर्सना खरा वाटला. पण, एआय-जनरेटेड फोटो अनेक जागतिक नेत्यांना ग्रुप सेल्फीमध्ये एकत्र असल्याचे खोटे चित्रसुद्धा बनवू शकते, ज्यामुळे दिशाभूल करणारा समज निर्माण होऊ शकतो.

सार्वजनिक व्यक्तींशी संबंधित घटना खऱ्या असल्याचे भासवण्यासाठी अधिकाधिक वास्तववादी एआय-जनरेटेड फोटो आणि व्हिडीओचा वापर केला जात आहे. त्यामुळे महत्त्वाच्या भू-राजकीय घटनांबाबत चुकीची माहिती पसरू नये आणि लोकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी अशा दृश्यांची पडताळणी करणे महत्त्वाचे आहे.

काय होत आहे व्हायरल?

एक्स (ट्विटर) युजर @smkumarlakshmi यांनी आपल्या प्रोफाईलवर हा फोटो शेअर केला आणि ‘हा फक्त एक फोटो नाही. हा काही लोकांसाठी इशारा आहे’ अशी कॅप्शन फोटोला देण्यात आली आहे.

इतर युजर्सदेखील असाच दावा करून हाच फोटो शेअर करीत आहेत.

https://www.facebook.com/share/p/1EjVNApZn9

డాలర్ ఆధిపత్యానికి బ్రిక్స్ బ్రేక్!..* 

तपास

BRICS परिषदेबद्दलच्या संबंधित बातम्या वाचून आम्ही आमच्या तपासाची सुरुवात केली.

दी इंडियन एक्स्प्रेसच्या (The Indian Express) एका बातमीत लिहिले होते की, इराणचे प्रतिनिधित्व अध्यक्ष मसूद पेझेश्कियन यांनी केले होते. मात्र, व्हायरल झालेल्या फोटोमध्ये इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रायसी इतर नेत्यांबरोबर दाखविण्यात आले आहेत.

https://indianexpress.com/article/explained/brics-summit-2026-key-leaders-new-delhi-10874202

तसेच या लेखात नमूद केले आहे की, ब्राझीलचे अध्यक्ष लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांच्याऐवजी परराष्ट्रमंत्री मौरो विएरा यांनी ब्राझीलचे प्रतिनिधित्व केले होते.

त्यामुळे हा फोटो एआय जनरेटेड असल्याचा संशय आला.

त्यानंतर आम्ही हा फोटो ‘HIVE Moderation’ या एआय कन्टेंट शोधणाऱ्या (content detector) टूलमधून तपासला. या टूलचा निकाल लागला की, हा फोटो एआयद्वारे तयार असण्याची शक्यता ९९.९ टक्के आहे.

आम्ही ओपनएआय (OpenAI) पडताळणी टूलद्वारेदेखील हा फोटो तपासला. तेव्हा या टूलने सुचवले की, हा फोटो OpenAI ची टूल्स वापरून बनवला गेला आहे.

निष्कर्ष

BRICS नेत्यांचा ग्रुप सेल्फी असल्याचा दावा करणारा व्हायरल फोटो एआय जनरेटेड आहे. BRICS परिषदेला उपस्थित न राहिलेले नेतेदेखील या फोटोमध्ये खोट्या रीतीने दाखवले आहेत. त्यामुळे हा व्हायरल दावा खोटा आहे.