एका महिला पोलीस कर्मचाऱ्याने लोकांसमोर माणुसकीचा एक नवा आदर्श तयार केला आहे. गुजरातच्या या महिला पोलिसाने वाळवंटाच्या प्रचंड गरमीमध्ये एका वयस्कर महिलेला आपल्या खांद्यावर उचलून घेऊन, ५ किलोमीटरचा पायी प्रवास करून त्या महिलेला सुखरूप घरी पोहचवले. ही वृद्ध महिला गुजरातच्या कच्छमधील एका मंदिरात मोरारीबापूंची कथा ऐकण्यासाठी आली होती. यादरम्यान उन्हामुळे ती बेशुद्ध झाली होती.

यानंतर महिला पोलीस कर्मचाऱ्याने माणुसकीचे अनोखे उदाहरण देत वृद्ध महिलेला मदत केली. कडक उन्हात तिने या महिलेला आपल्या खांद्यावर बसवून ५ किलोमीटर चालत सुखरूप तिच्या घरी पोहोचवले. या महिला पोलिसाचे देशभरातून कौतुक होत आहे. खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांनी ट्विट करून या महिला पोलिसाच्या कामाचे कौतुक केले आहे.

Stone Pelting in West Bengal
Ram Navami : पश्चिम बंगालमध्ये हिंसाचार, मिरवणुकीत दगडफेक; पोलिसांकडून अश्रूधुराच्या नळकांड्यांचा वापर!
Concerned about the security of Indians in Iranian custody
जहाजावरील कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय चिंतेत; इराणच्या ताब्यातील भारतीयांच्या सुरक्षेची चिंता
fire workers huts at Mira road
मिरारोड येथे कामगारांच्या झोपड्यांना भीषण आग, चार सिलेंडरचा स्फोट; सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

किली पॉलच्या कुऱ्हाडीसोबच्या अ‍ॅक्शन सीनवर नेटकरी झाले फिदा! बघा Viral Video

Shocking Video: विना ड्रायव्हर पार्किंगमधून निघाली कार, आणि…

कच्छच्या खदीर बेटावर असलेल्या भांजदादाच्या मंदिरात मोरारीबापूंची रामकथा सुरू आहे. एक ८६ वर्षीय महिला रामाची कथा ऐकण्यासाठी डोंगरावर चढत होती. यादरम्यान तिला उष्णता सहन न झाल्याने ती बेशुद्ध होऊन जमिनीवर पडली. ही बाब महिला कॉन्स्टेबल वर्षाबेन परमार यांना समजताच त्यांनी तातडीने वृद्ध महिलेच्या मदतीसाठी धाव घेतली आणि महिलेला खांद्यावर उचलले. यानंतर कडक उन्हात ५ किमी चालत महिलेला तिच्या घरी नेले.

गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी महिला पोलिसाचे कौतुक करत ‘खाकीची मानवता’ असे ट्विट केले आहे. त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, “कच्छमधील रापर येथे मोरारीबापूजींची कथा ऐकण्यासाठी पायी निघालेल्या ८६ वर्षीय महिलेचे अचानक स्वास्थ्य बिघडल्यामुळे महिला पोलीस कर्मचारी वर्षाबेन परमार यांनी त्यांना खांद्यावर घेऊन ५ किमी चालत त्यांच्या घरापर्यंत नेऊन सेवेचा उत्कृष्ट नमुना ठेवला आहे.”