साप अनेकदा जंगल आणि झुडपे सोडून निवासी भागात शिरतात, पण तुम्ही कधी ऐकले आहे की साप लपून भारतातून इंग्लंडला गेला आहे. अलीकडेच असेच एक आश्चर्यकारक प्रकरण समोर आले आहे. अहवालानुसार, एका विषारी सापाने अलीकडेच शिपिंग कंटेनरमध्ये लपून भारतापासून इंग्लंडपर्यंत लांबचा प्रवास केला आहे. शिपिंग कंटेनरमध्ये सापडलेल्या सापाची माहिती ब्रिटिश पशुवैद्यकीय रुग्णालयाला देण्यात आली होती, त्यानंतर मोठ्या काळजीने सापाची सुटका करण्यात आली. इंग्लंडमधील साऊथ एसेक्स वन्यजीव रुग्णालयाने फेसबुकवर एका पोस्टद्वारे या घटनेची माहिती दिली आहे.

हॉस्पिटलच्या म्हणण्यानुसार, त्यांना भारतातून आलेल्या शिपिंग कंटेनरमध्ये साप लपल्याची माहिती मिळाली. माहिती मिळताच हॉस्पिटलने एक टीम पाठवली आणि सापाची सुटका करण्यात आली. त्या प्रजातीचे साप इंग्लंडमध्ये सापडत नाहीत. फेसबुकवर सापाचे फोटो शेअर करताना, कॅप्शन लिहिले आहे – आज येणाऱ्या अनेक ब्रिटिश वन्यजीवांच्या प्रजातींव्यतिरिक्त, आम्हाला सापाबद्दलही फोन आला जो तो ज्या देशात असायला हवा होता तिथे नाही.

Railway Bharti 2024
Railway Bharti 2024 : रेल्वेमध्ये टेक्निशियनच्या ९००० पेक्षा अधिक पदासाठी होणार भरती, आजच करा अर्ज
whatsapp and instagram down
व्हॉट्सॲप, इन्स्टाग्राम सेवा खंडीत; जाणून घ्या मध्यरात्री काय झालं?
BMW iX xDrive50 launch
बाकी कंपन्यांची उडाली झोप, नवी इलेक्ट्रिक SUV देशात दाखल, सिंगल चार्जमध्ये धावते ६३५ किमी, पण किंमत तर…
stock markets rise for 3rd session sensex rises 190 points nifty settles at 22096
सलग तिसऱ्या सत्रात वाढ; ‘सेन्सेक्स’ची १९० अंशांची कमाई

( हे ही वाचा: धक्कादायक: २५ वर्षीय सोशल मीडिया स्टारचा मृत्यू; लाइव्ह दरम्यानच कीटकनाशक प्यायली! )

सर्वात विषारी साप

रुग्णालयाच्या म्हणण्यानुसार, सापाला वाइपर म्हणून ओळखले गेले आहे, जे विषारी सापांच्या प्रजातींमध्ये समाविष्ट आहे. पोस्टमध्ये सापाच्या प्रजातींची माहिती देताना ते म्हणाले की, हा साप सापांच्या सर्वात प्राणघातक प्रजातींच्या शीर्षस्थानी आहे.जे इतर प्रजातींपेक्षा जास्त विषारी आहेत. साप पकडताना, त्याला मानवी संपर्कापासून दूर ठेवण्यासाठी विशेष काळजी घेण्यात आली.

( हे ही वाचा: हवामानाचे अपडेट देत असताना अचानक प्ले झाला पॉर्न व्हिडीओ, टीव्ही अँकरचा व्हिडीओ व्हायरल! )


लोकांनी पोस्टवर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने लिहिले आहे – टीमने चांगले काम केले… दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले – मी सापांचा प्रेमी नाही, पण तो सुरक्षित आहे याचा मला खूप आनंद आहे