Uber Driver Take Care Of Passengers : ऑफिस किंवा मित्र-मैत्रिणींबरोबर बाहेर जाण्याचा प्लॅन जायचं असेल तर आपल्यातील अनेक जण लगेच ओला किंवा उबरवर बाईक बुक करतात. पण, या उबर, ओला बाईक चालकांविरुद्ध फारसे चांगले अनुभव प्रवाशांना आलेले नाहीत. पण, व्हायरल पोस्टमधील एका प्रवाशाचा असा अनुभव सांगितलं की, प्रत्येक त्याने सोशल मीडियावर कौतुक करताना दिसत आहे.

चेन्नई येथील एका उबर बाईक चालकाने प्रवाशांच्या आराम आणि सुरक्षिततेसाठी जबरदस्त सोय केलेली दिसते आहे. लिंक्डइनवरील एका पोस्टमध्ये, सुगंधाश्री (प्रवासी) यांनी अरुण कुमार आर (चालक) यांच्याबरोबरचा तिच्या खास प्रवासाबद्दल सांगितले आहे. अनेक चालक दररोज हेल्मेटखाली घालण्यासाठी शॉवर कॅप वापरतात.तर बाईकवर बसण्यापूर्वी, अरुण चालकाने तिला हेल्मेटखाली घालण्यासाठी शॉवर कॅप दिली. एवढेच नाही तर बरेच प्रवासी त्याचे हेल्मेट वापरत असल्याने, तो सर्वांना प्रत्येकवेळी नवीन शॉवर कॅप देतो.

हेतू चांगला असेल तर यश मिळतंच (Viral Photo)

एवढेच नाही तर अचानक पाऊस पडल्यास त्याने त्याच्या मागे बसणाऱ्यांसाठी रेनकोट आणि सेफ्टी बेल्ट सुद्धा ठेवला जेणेकरून जर एखादा प्रवासी झोपला तर तो दुचाकीवरून पडू नये. हे पाहून प्रवासी सुगंधाश्रीला खरोखरच धक्का बसला. चालकाचे कष्ट आणि त्या कष्टामागची त्याची काळजी शब्दांच्या पलीकडे आहे. त्यांच्या प्रत्येक राईडसाठी किती कमावतो याबद्दल कल्पना नाही; पण, त्याने दाखवलेल्या समर्पणाची भरपाई कोणतीही रक्कम करू शकत नाही एवढे तर नक्कीच…

पोस्ट नक्की बघा…

https://www.linkedin.com/posts/suganthashri-g_uber-deliverypartner-chennai-activity-7384448643770265600-TarG?utm_source=li_share&utm_content=feedcontent&utm_medium=g_dt_web&utm_campaign=copy

सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट @Suganthashri G या लिंक्डइन अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे आणि कॅप्शनमध्ये प्रवासी महिलेने तिच्या प्रवासाचा अनुभव शेअर केला आहे. ” जे नेहमी केले जात नाही ते करायला धाडस लागते आणि हेतू चांगला असेल तर खरंच यश मिळते”,”अरुण काळजी घेऊन प्रामाणिकपणे काम करतो. अशी माणसं उबर कंपनी आणि समाजासाठी खूप महत्वाची आहेत” “अशा माणसांमुळे जीवनातील दयाळूपणावरचा विश्वास अधिक मजबूत होतो” ; आदी अनेकविध कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.