viral post sugarcane juice vendor is influencer : प्रत्येक जण मेहनत करतोच. तो लहान किंवा मोठा नसतो. तर प्रत्येकाच्या प्रयत्नाला लवकर किंवा उशिरा कष्टाचं फळ मिळतं. कोणाचं काम पटकन लोकांच्या पसंतीस उतरतं तर कोणाचं उशिरा. त्यामुळे वेळ येते. पण, त्यादरम्यान प्रत्येकाला स्वतःची एक योजना वापरावी लागते. सोशल मीडियावर अशीच एक पोस्ट व्हायरल होते आहे, यामध्ये उसाचा रस विकणाऱ्या विक्रेत्याची चर्चा होताना दिसते आहे आणि ही चर्चा त्यांचे दुकान किंवा त्याच्या उसाचा रस विकण्याच्या पद्धतीवरून नाही तर कारण – खूपच काहीतरी खास आहे.
@poojaofficial5 या एक्स (ट्विटर) वरून शेअर केलेल्या पोस्टनुसार मार्केटमध्ये एक उसाचा रस विकणाऱ्या एका विक्रेत्याचा स्टॉल पाहून ती थक्क झाली. कारण त्या गाडीवर विक्रेत्याच्या इन्स्टाग्राम आयडी लिहून ठेवला होता. सुरवातीला वाटलं त्याने अगदी गंमतीत हा आयडी लिहिला असावा. पण, जेव्हा तिने इन्स्टाग्रामवर जाऊन ते अकाउंट सर्च केलं, तेव्हा मात्र तिला दुसरा धक्का बसला ते म्हणजे त्याचे इन्स्टाग्राम अकाउंटवर त्याचे १.२५ लाख फॉलोअर्सपर्यंत आणि तो एक इन्फ्लुएन्सर आहे. तेव्हा तिने आश्चर्याने याबद्दल विक्रेत्याला विचारले.
सातत्य आणि खरी मेहनत (Viral Post)
तेव्हा विक्रेता हसून म्हणाला “काही नाही मॅडम. मी जे काम करतो त्याचे व्हिडीओ रोज इन्स्टाग्राम टाकतो आणि लोक ते आवडीने बघतात”. त्या विक्रेत्याचे विचार अगदी त्याच्या स्टॉल इतकेच वेगळे असतात. तेव्हा तिच्या पटकन डोक्यात आलं की, कोणताही मेहनत करणारा माणूस लहान नसतो. काही माणसं हातात कॅमेरा घेऊन तर काही माणसं उसाचा रस विकून त्यांचे भविष्य घडवत असतात. त्यामुळे युजरने विक्रेत्याच्या स्टॉलचा फोटो काढून पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये ही सगळी माहिती सविस्तर लिहिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट एकदा तुम्हीसुद्धा नक्की बघा…
पोस्ट नक्की बघा…
सोशल मीडियावर व्हायरल होणारी ही पोस्ट @poojaofficial5 या एक्स (ट्विटर) अकाउंटवरून शेअर करण्यात आली आहे. एका नेटकाऱ्याने देखील ही पोस्ट पाहून “एक उसाचा रस विकणारा व्यक्ती फक्त नियमितपणे त्याच्या कामाचे व्हिडीओ पोस्ट करून १.२५ लाख फॉलोअर्सपर्यंत पोहोचला. त्याच्याकडे मोठं स्टुडिओ नाही, टीम नाही. फक्त सातत्य आणि खरी मेहनत आहे. आजच्या काळात मोठ्या संधी फक्त मोठ्या शहरात किंवा उच्च पदाच्या नोकरीत नाहीत. तर आपल्या दैनंदिन कामातही आहेत” ; असा मोलाचा सल्ला दिला आहे.
